एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 ऑक्टोबर 2019 | शनिवार
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. जेजेपीला उपमुख्यमंत्रीपद दिल्याने भाजपचा हरियाणातला सत्तास्थापनेचा मार्ग सुकर, महाराष्ट्रातही तोच पॅटर्न राबवणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष 2. परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर आता किनारपट्टीला क्यार वादळाचा धोका, कोकणात हाय अलर्ट, मुंबईतही परिणाम जाणवण्याची शक्यता 3. अतिआत्मविश्वास आणि बंडखोरांमुळे युतीच्या जागा घसरल्या, 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत पवारांचं विश्लेषण, तर नवख्या आमदारांना मोलाचा सल्ला 4. वंचितने खाल्लेल्या मतांमुळे तब्बल 32 मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव, प्रकाश आंबेडकरांनी आघाडीच्या सत्तेची वाट रोखल्याची चर्चा 5. आरेला कारे करणाऱ्या शिवसेनेशी नारायण राणेंची जुळवून घेण्याची भाषा, मनात द्वेषही नसल्याचं स्पष्टीकरण, निकालानंतर राणेंची प्रतिक्रिया 6. बाबा आम्ही करुन दाखवलं, अमित आणि धीरज या दोन्ही भावांच्या विजयानंतर अभिनेता रितेश देशमुखचं भावनिक ट्वीट 7. दिवाळीमुळे उद्या मेगाब्लॉक नाही, लोकलच्या तिन्ही रेल्वे मार्गावर मुंबईकरांना दिलासा, गावी जाणाऱ्या गाड्यांना मात्र तोबा गर्दी 8. दीपोत्सवाचा देशभर उत्साह, बाजारपेठा सजल्या, दिल्लीसह अनेक शहरात सुरेल कार्यक्रमांचं आयोजन 9. ब्राझीलमध्ये जाण्यासाठी भारतीयांना यापुढे व्हिसा काढण्याची गरज नाही, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांच्याकडून नियम शिथील 10. बेस्टच्या सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्या, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, तब्बल 31 हजार 462 कर्मचाऱ्यांना फायदा
आणखी वाचा























