Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 एप्रिल 2021 | शुक्रवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा एबीपी माझा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. हाफकिन इन्स्टिट्युटला लस निर्मितीसाठी केंद्राची परवानगी, भारत बायोटेकच्या मदतीनं कोवॅक्सिनची निर्मीती करणार, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
2. पुण्यासाठी 20 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची मुंबईचे आयुक्त इकबाल चहल यांना विनंती, राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा कायम
3. संचारबंदीतही गर्दीचं चित्र कायम राहिल्यास राज्यात पूर्ण लॉकडाऊन, मदत पुनर्वसन मंत्र्यांचा इशारा, तर अत्यावश्यक सेवेसह इंधन विक्रिवरही निर्बंधांचे संकेत
4. बुलढाणा आणि मालेगावमध्ये काही तासच पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा, वेळेत पुरवठा न झाल्यास परिस्थिती बिकट, तर मुंबईकरांकडून ऑक्सिजन सिलेंडरची वैयक्तिक खरेदी
5. कोरोना स्थितीचा नवी मुंबईत भूमाफियांकडून फायदा, ऐरोलीसह, घणसोली, कोपरखैरणीतील गावठाण भागांत अनधिकृत बांधकाम तेजीत, पालिका आयुक्तांकडून कारवाईचे संकेत
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 एप्रिल 2021 | शुक्रवार | ABP Majha
6. महामंडलेश्व कपिलदास यांचा कोरोनामुळे मृत्यू, नागासाधूंच्या निरंजनी आखाड्याची कुंभमेळाव्यातून माघार, तर हरिद्वारमधील कुंभमेळावा गुंडाळण्याची शक्यता
7. देशात पुन्हा लॉकडाऊनची चाहुल, ताजमहालसह पुरातत्व खात्याअंतर्गत येणारी प्रमुख स्मारकं आणि संग्रहालयं बंद, दिल्लीत विकेंड लॉकडाऊन तर राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू
8. राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की, तो कसा होणार हे अजित पवरांनाही माहीत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं अजित पवारांकडे बोट
9. मुंलूडमध्ये नो पार्किंगमधील गाडी काढायला सांगितल्यानं दुकानदाराची पोलिसांना शिवीगाळ, पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न
10. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला बीबीसीआयकडून सात कोटींचं कॉन्ट्रॅक्ट, अजिंक्य रहाणे पाच, शार्दुल ठाकूरला तीन, तर श्रेयस अय्यरला एक कोटींचं कॉन्ट्रॅक्ट