एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 एप्रिल 2021 | गुरुवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 एप्रिल 2021 | गुरुवार | ABP Majha
- राज्यात काल रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरु, आपातकालीन सेवा वगळता दुकानं बंद राहणार; आपातकालीन प्रवासासाठी पासची गरज लागणार नाही
- गर्दी होत असल्यास स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा बंद कराव्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना; तर संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही आदेश
- कोरोनाच्या संकटात वेगवेगळ्या मागण्यांसाठी शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचं कामबंद आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
- राज्यात काल दिवसभरात 58 हजार 952 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, तर कोरोनाचे 39 हजार 624 रुग्ण बरे होऊन घरी परतले
- एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार, उस्मानाबादेतील कालची घटना; जागा अपुरी पडल्याने 8 मृतदेहांचा अंत्यविधी लांबणीवर
- राज्यात कडक निर्बंध लागू झाल्यानंतर मुंबईतील एलटीटी स्थानकाबाहेर परप्रांतीयांची मोठी गर्दी; गावी जाण्यासाठी लोकांची झुंबड
- साताऱ्यात गारपीट, वाठार परिसरात बर्फाचा खच; वाशिम, बीड, बारामतीत अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक पीकांचं नुकसान
- सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय, हे कुणा येरा गबाळ्याचं काम नाही; पंढरपूर पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल तब्बल 11 तास सीबीआय चौकशी; सीबीआयचं पुढचं पाऊल काय असणार याकडे सर्वांचं लक्ष
- कतारमध्ये ड्रग्ज प्रकरणात बळीचा बकरा बनलेलं भारतीय दाम्पत्य दोन वर्षांनी मायदेशी परतलं; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) केलेल्या प्रयत्नामुळे निर्दोष सुटका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जॅाब माझा
Advertisement