Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 मार्च 2021 | सोमवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

1. मराठा आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांसह राज्यातील प्रमुख नेत्यांना पत्र
2. स्फोटकं प्रकरणात सचिन वाझेंवर बड्या नेत्याचा वरदहस्त असल्याची एनआयएला शंका, सूत्रांची माझाला माहिती
3. सचिन वाझेंच्या निलंबनाची शक्यता, तर अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणात 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी, स्कॉर्पिओसोबतची इनोव्हा कार एनआयएच्या ताब्यात
4. आजपासून मंत्रालयातील जलसंधारण विभागात 2 शिफ्टमध्ये काम चालणार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात शिफ्ट पॅटर्न
5. सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांची संपाची हाक, आज-उद्या बँका बंद राहणार
6. राज्यात काल दिवसभरात 16,620 नवे रुग्ण तर 50 जणांचा मृत्यू, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसारखी स्थिती, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
7. राज्याची उपराजधानी नागपुरात आजपासून लॉकडाऊन, कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
8. कोरोनामुळे लग्नकार्यावर होणाऱ्या वाऱ्यामाप खर्चाला कात्री; यवतमाळमध्ये नोंदणी विवाहांमध्ये वाढ
9. मालमत्ता कर वसुलीसाठी बीएमसीची कारवाई; कुठे अलिशान वाहनांची जप्ती, तर कुठे पाणीपुरवठा खंडीत
10. लातूरमध्ये विनयभंग प्रकरणात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
