एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 05 फेब्रुवारी 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. वर्ध्यातील जळीतकांडातील पीडितेसाठी राज्यभर प्रार्थना, 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर उपचाराचा खर्च सरकारने उचलला, उज्ज्वल निकम खटला लढणार, गृहमंत्र्यांची माहिती
2. हिंगणघाटची घटना ताजी असताना आणखी एका महिलेला घरात घुसून पेटवलं, औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक घटना, आरोपी अटकेत
3. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही पाच दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता, तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
4. शरद पवारांना वारकऱ्यांनी कार्यक्रमाला बोलवू नये, राष्ट्रीय वारकरी परिषदेचं पत्रक, पवार हिंदू विरोधी असल्याचा आरोप
5. शिवसेनेचा आरेतील वृक्षतोडीला विरोध, मात्र बीएमसी बजेटमध्ये 3 हजार वृक्षतोडीला परवानगी, शेलारांकडून समाचार, बजेटमध्ये मुंबईकरांवर कराचा बोजा नाही
6. नवी मुंबईतल्या 3 लाख कुटुंबांना ठाकरे सरकारकडून दिलासा मिळणार, गरजेपोटी बांधलेल्या घरांवर तोडक कारवाई न करता संरक्षण, एकनाथ शिंदेंची माहिती
7. महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग सिंगल यूज प्लॅस्टिकमुक्त करा, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आयुक्तांना आदेश
8. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांचा राजीनामा, ठाकरे सरकारकडून हायकोर्टात राजकीय नियुक्ती असल्याचा उल्लेख केल्याने रहाटकर पायउतार
9. हिरव्या पावसानंतर आता डोंबिवलीत केमिकलमुळे गुलाबी रस्ते, उग्र वासामुळे रहिवाशांना डोकेदुखी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष
10. भारत-न्यूझीलंड वन डे मालिकेला आजपासून सुरुवात, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघ हॅमिल्टनमध्ये खेळणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement