Majha Maharashtra Majha Vision LIVE : कंगनापेक्षा शेतात राबणाऱ्या आमच्या माउलीला प्रसिद्धी द्यायला हवी - गुलाबराव पाटील
ABP Majha Maharashtra Majha Vision LIVE Updates: महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती होत आहे. नव्या महाराष्ट्रसाठी सत्ताधाऱ्यांचं व्हिजन काय आहे? जाणून घेऊया 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'मध्ये.
LIVE
Background
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोरोनामुळे आलेली महामारी, निसर्ग चक्रीवादळ, मराठा आरक्षणाला स्थगिती, अनलॉकच्या प्रक्रियेत विविध सुरु करण्यासाठी झालेली आंदोलनं, वाढीव वीज बिल आंदोलन अशा विविध आव्हानांना ठाकरे सरकारला तोंड द्यावं लागलं. उद्या या सरकारची वर्षपूर्ती होत आहे. या निमित्ताने ठाकरे सरकारचा एक वर्षातील कार्याचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भवितव्याविषयीचं सरकार आणि दिग्गज नेतेमंडळींचं व्हिजन जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सरकारमधील मंत्र्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचं महाराष्ट्रासाठी व्हिजन काय हे आज दिवसभरात जाणून घ्यायचं आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर एबीपी माझावर पाहू शकणार आहात.
असा असेल कार्यक्रम
सकाळी 10 वाजता - नितीन राऊत वि. चंद्रशेखर बावनकुळे
सकाळी 10.30 वाजता - सुभाष देसाई
सकाळी 11 वाजता - अशोक चव्हाण
सकाळी 11.30 वाजता - एकनाथ शिंदे
दुपारी 12 वाजता - बाळासाहेब थोरात
दुपारी 12.30 वाजता - चंद्रकांत पाटील
दुपारी 1 वाजता - जयंत पाटील
दुपारी 1.30 वाजता - राजेश टोपे
दुपारी 2 वाजता - नारायण राणे
दुपारी 2.30 वाजता - वर्षा गायकवाड
दुपारी 3 वाजता - देवेंद्र फडणवीस
दुपारी 4 वाजता - हसन मुश्रीफ
दुपारी 4.30 वाजता -
दुपारी 5 वाजता - आदित्य ठाकरे