कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज माऊलींच्या पालखी सोहळ्याने दोन दिवसांचा लोणंदमधला मुक्काम आटोपून चांदोबाचा लिंब याठिकाणी पहिले उभे रिंगण पार पडले असते. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज कविवर्य मोरोपंतांच्या बारामतीमधून प्रस्थान ठेवले असते. काटेवाडीमध्ये आल्यानंतर तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांनी गोल रिंगण घातले असते.


प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये स्थिरावला असता.. नीरा स्नान झाल्यानंतर लोणंद मुक्कामी आलेल्या पालखी सोहळ्या मध्ये आता वारकऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागलेली असते.. कारण मुक्काम दर मुक्काम करून आषाढी वारी जसे पंढरपूरकडे कूच करत असते. तसे रस्त्यामध्ये अनेक वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात.


पालखी सोहळ्यातील दिनक्रम.. मुक्कामाचे ठिकाण वेळ.. सगळं सुनिश्चित झालेले असते..मात्र लोणंद मध्ये कोणत्या वर्षी वारीचे किती मुक्काम असतात हे तिथी वर ठरवण्याची प्रथा आहे. म्हणूनच लोणंद मध्ये कोणत्या वर्षी पालखीचा मुक्काम दीड दिवसाचा असतो तर कोणत्या वर्षी तोच मुक्काम अडीच दिवसाचा देखील करण्याची प्रथा आहे.. या वर्षी जर वारी निघाली असती तर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा लोणंद मध्ये अडीच दिवसाचा मुक्काम झाला असता.. एरवी इतर ठिकाणी पालखी मार्गात पालखीचे प्रस्थान हे सकाळी लवकर केले जायचे मात्र लोणंद मुक्कामी मात्र लोणंद मुक्कामी असलेली पालखी ही आज दुपारी मध्यन्ह आरती झाल्यावर तरडगावसाठी प्रस्थान ठेवले असते.



आजचा दिवस माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असायचा कारण आजच्या दिवशी माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब याठिकाणी पार पडायचे. प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज चांदोबाचा लिंब या ठिकाणी सकाळपासूनच तरडगाव लोणंद परिसरातील भक्तांनी मोठी गर्दी केली असती. रस्त्याच्या दुतर्फा जागा धरून बसण्यासाठी सकाळ पासूनच लोक चांदोबाचा लिंब परिसरामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली असायची.


रस्त्यावर रांगोळ्या काढलेल्या असायच्या.. रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी अबालवृद्ध नटून थटून चांदोबाच्या लिंब परिसरामध्ये जमा व्हायचे. नोकरी आणि कामधंदा निमित्त पुण्या-मुंबईला राहणारे अनेक गावकरी आजच्या दिवशी आपल्या गावी परत यायचे. कारण घरच्या सगळ्या सदस्यांसोबत हा उभा रिंगणाचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी वर्षभर या परिसरातील लोक आतुर झालेले असायचे. यावर्षी मात्र वारीच निघाली नाही तिथे रिंगण सोहळा पाहायचे राहून गेल्याची खंत अनेक गावकरी बोलून दाखवत आहेत.


लोणंद मार्गस्थ झालेल्या पालखीने आज खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यामध्ये प्रवेश केला असता. फलटण तालुक्याच्या हद्दीमध्ये येताच प्रशासनाच्या वतीने माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्याची प्रथा आहे. आता मात्र वारकरी वायुवेगाने चांदोबाचा लिंब आकडे निघालेल्या असायचे. ऊन सावलीचा खेळ अंगावर घेत कुठे रस्त्यात फुगड्या सर कुठे फेर धरुन हे वारकरी आता चांदोबाच्या लिंब परिसरामध्ये पोहोचायला सुरुवात झालेली असायची.



यापूर्वीच या उपक्रमामध्ये पावसासोबत दोन हात करणाऱ्या वारकऱ्यांना आता मात्र मोकळे आभाळ मिळायचे आता इथून पुढे कुठेही डोंगर नाही कुठेही वळण रस्ता नाही मोठ्या आणि रुंद पालखी मार्गावर वेगवेगळे खेळ खेळत वारकरी चांदोबाचा लिंब या ठिकाणी पोहोचायचे. पालखी चांदोबाचा लिंब या ठिकाणी पोहोचली की चोपदार पालखी वर चढायचे आणि चोप आकाशात उंचावला की हा सगळ्यांसाठी इशारा असायचा. रस्त्यामध्ये इतकी गर्दी करून उभे असलेले वारकरी आणि भाविक क्षणार्धात रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहायचे आणि उभे रिंगण सुरु व्हायचे.


माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सत्तावीस दिंड्यांमध्ये वारकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे टाकायचे. माऊलींचा अश्व रथाजवळ आला की या आश्वाला पुष्पहार घातला गेला असता खारीक खोबऱ्याचा नैवेद्य ही चारला गेला असता. माऊलींच्या अश्वापालासोबत स्वारीचा अश्व असे रस्त्याच्या दुतर्फा जिथपर्यंत वारकरी थांबले आहेत तिथपर्यंत एक फेरी मारून घ्यायचे. यावेळी ज्ञानोबा-तुकोबाचा झालेला जयघोष हा अंगावर शहारे आणणारा असायचा. पालखीच्या एका बाजूने माऊलींचा अश्व हा दीड-दोन किलोमीटरची फेरी पूर्ण करायचा तर दुसऱ्या बाजूला स्वारीचा अश्व अशीच फेरी करुन पालखीजवळ येऊन थांबला की हे रिंगण पूर्ण झालेले असायचे.


रस्त्यावरुन हा घोडा धावून पुढे गेल्यानंतर त्या जागेवरचे माती आपल्या कपाळी लावून दर्शन घेण्याचे प्रथा या रिंगण सोहळ्यामध्ये आहे. हा सगळा रिंगण सोहळा डांबरी रस्त्यावर झाला असला तरी अश्व गेलेल्या ठिकाणी हात लावून आपल्या कपाळाला हात लावला के माऊलीचे दर्शन झाल्याची अनुभूती या भक्तांना मिळत असे.


माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये एकूण चार रिंगण होत असतात. त्यातले पहिले रिंगण हे आज चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडले असते. दुसरे उभे रिंगण हे भंडीशेगाव नंतर बाजीराव विहीर येथे झाले असते. तिसरे वाखरीमध्ये आणि चौथे पंढरपूरला पादुका जवळ पार पडले असते. पण या वर्षी जिथं वारीच निघाली नाही त्यामुळे याची देहा याची डोळा अद्भुत प्रचिती देणारे रिंगण सोहळा होणार नाही.



तुकाराम महाराजांच्या पालखीचे काटेवाडीमध्ये मेंढ्याचे रिंगण पार पडले असते..


प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असते तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज कविवर्य मोरोपंतांचा कर्मभूमीतील मुक्काम आटोपून पुढे सणसरसाठी प्रस्थान ठेवले असते. तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील पहिले मेंढ्यांचे गोल रिंगण आज काटेवाडीमध्ये पार पडले असते.


पवार कुटुंबियाच्या काटेवाडीमध्ये आज तुकोबांची पालखी येत असायची. याच काठेवाडी मध्ये तुकोबांच्या पालखीचे मेंढ्याचे रिंगण पार पडायचे. काटेवाडी परिसर स्वागतासाठी सज्ज झालेला असायचा. बारामतीमधून सकाळीच पालखीने प्रस्थान ठेवले असते वारकरी मात्र पालखीच्या पुढे चालत येऊन दुपारी काटेवाडीमध्ये थांबत असत. बारामती शहरातून एकदा पालखी सोहळा बाहेर पडला की हिरव्या गर्द झाडीतून जाणारा निमुळता रस्ता आणि निसर्गाची अलौकिक देणगी असलेला हा परिसर वारकऱ्यांनी फुलून यायचा.


काटेवाडीमध्ये वारकऱ्यांच्या स्वागतासाठी भली मोठी कमान लागलेली असायची रस्त्याच्या दोन्ही बाजूला चहा-नाश्ता फराळाचे दुकान पाहायला मिळायचे. काटेवाडीमध्ये पोहोचलेले वारकरी दुपारचे जेवण याच गावात येत असायचे पंचक्रोशीतील अनेक लोक वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी सकाळपासून लगबग करतानाचे चित्र पाहायला मिळायचं.


पालखी काटेवाडीमध्ये पोहोचले की परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या घालण्याची मोठी परंपरा काटेवाडी गावांमध्ये आहे. सनई.. चौघडे.. ढोल.. ताशा.. आणि त्याच्यासमोर ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष करणारे शाळकरी मुलं वारकऱ्यांच्या पेहरावामध्ये पालखीसोबत चालत गावातल्या पादुका मंदिराजवळ पोहोचायचे आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात अवघे काटेवाडी दंग होऊन जायचे. पवार कुटुंबियांच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत केलं जायचं.


आणि मग सुरु व्हायचा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचे गोल रिंगण. पालखी काटेवाडीमध्ये मुख्य रस्त्यावर आणली जायची. पालखी भोवती फिरवण्यासाठी मेंढ्यांना उभं केलं जायचं. हे नयन रम्य दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील आबालवृद्ध सकाळपासूनच जागा धरुन उभा टाकलेले असायचे. यासाठी सातशे ते आठशे मेंढ्या आणल्या जायच्या. ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोषामध्ये मेंढ्यांना पालखीच्या होते फिरवला जायचं आणि गोल रिंगण पार पडायचं.



पूर्वी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा जात असताना काटेवाडीमधील एका मेंढपाळाने मेंढ्याची रोगराई जाण्यासाठी पालखी रथाभोवती मेंढ्यांचे रिंगण घातले होते तेव्हापासून ही आगळीवेगळी परंपरा सुरु झाली ती आजतागायत चालू आहे. हे गोल रिंगण पार पडल्यानंतरच पुढे तुकाराम महाराजांचा पालखीचा सोहळा सनसर साठी प्रस्थान ठेवले असते.


प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याचा तरडगावमध्ये मुक्काम राहिला असता आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सनसरमध्ये विसावला असता..


क्रमशः


यापूर्वीच्या प्रवासाचे टप्पे