एक्स्प्लोर

बंडखोरी झालेल्या 40 जागांवर निवडणुका घ्या; सत्ता जिंकते की सत्य जिंकते कळू द्या; आदित्य ठाकरेंचं चॅलेंज

Aaditya Thackeray On Sanjay Raut Arrest :  बंडखोरी झालेल्या 40 जागांवर निवडणुका घ्या; सत्ता जिंकते की सत्य जिंकते कळू द्या असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं आहे. 

Aaditya Thackeray On Sanjay Raut Arrest : शिवसेनेचे खासदार संजय राऊत संजय राऊत (Sanjay Raut Case)  यांना अखेर रात्री ईडीनं (ED) अटक केली. राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना राज्यभर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा देखील झंझावाती दौरा सुरु आहे.  महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरु आहे. संजय राऊतांची अटक हे कटकारस्थान आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. बंडखोरी झालेल्या 40 जागांवर निवडणुका घ्या,सत्ता जिंकते की सत्य जिंकते कळू द्या, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, ठाकरे परिवार कधीही संपणार नाही. समोर असलेलं हे ठाकरे परिवार आहे.कोकणाचा आवाज म्हणजे शिवसेनेचा आवाज आहे. बंडखोरांनो राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असं म्हणत त्या 40 लोकांसाठी अजूनही मातोश्रीचे दरवाजे अजूनही उघडे आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळं आहे. कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कळत नाही. शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे, असं ते म्हणाले. 

शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

एकीकडे संजय राऊत यांच्या अटकेमुळे शिवसेनेला हादरा बसला असताना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज तळकोकणातून त्यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करत आहेत. आदित्य ठाकरे आज सकाळी चिपी विमानतळावर पोहोचले.  तर  संध्याकाळी आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात मेळावा आहे.

'शिव संवाद' यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक

दिवस पहिला, सोमवार 1 ऑगस्ट
- सकाळी 11.30 वाजता कुडाळ येथे शिव संवाद यात्रा
- दुपारी 12.30 वाजता सावंतवाडी येथे मेळावा
- सायंकाळी 6.30 वाजता कोल्हापूर शहर येथे मेळावा

दिवस दुसरा, मंगळवार 2 ऑगस्ट
- सकाळी 10 वाजता कोल्हापूर येथून शिरोळकडे रवाना होणार
- दुपारी 12 वाजता शिरोळ येथे शिव संवाद यात्रा
- दुपारी 3.15 वाजता पाटण येथे शिव संवाद
- सायंकाळी 6.45 कात्रज येथे शिव संवाद

कोकणात पॉलिटिकल मंडे, आदित्य सिंधुदुर्गात तर भाजप नेत्यांचा रत्नागिरी दौरा
कोकणातला आजचा दिवस हा पॉलिटिकल मंडेच म्हणावा लागेल. कारण बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सावंतवाडी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आदित्य यांच्या दौऱ्यावेळी सावंतवाडी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन शिवसैनिकांकडून केले जाणार आहे. यावेळी आपल्या जाहीर भाषणात आदित्य ठाकरे नेमकं काय बोलतात? दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आतापर्यंतच्या टीकेला काय उत्तर देतात? हे पाहावं लागणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला

Embed widget