एक्स्प्लोर
Advertisement
सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकरे जिल्हा परिषदेच्या रिंगणात
रोहा (रायगड) : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांनी राजकारणात पदार्पण केलं आहे. रोहा तालुक्यातील वरसे या जिल्हा परिषद गटातून आदिती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे. यंदाच्या या निवडणुकीत देखील ही युती कायम असून गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याही पक्षाने अधिकृत यादी जाहीर न केल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करीत विविध पक्षात प्रवेश केला.
आदिती तटकरे यांचा अर्ज भरण्यासाठी आमदार अवधूत तटकरे आणि आमदार अनिल तटकरे हे देखील हजर होते. यावेळेस राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी तटकरे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला होता. मात्र, शरद पवारांनी मध्यस्थी करत अनिल तटकरे आणि सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करुन वाद मिटवला. त्यामुळे आता आदिती तटकरे यांच्या पाठीशी संपूर्ण तटकरे कुटुंब असल्याने त्यांच्या लढतीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
पाहा व्हिडीओ :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement