Winter Assembly Session: आधार कार्ड ( Aadhar Card) आपल्या नागरिकत्वाचा एक अत्यंत महत्वाचा पुरावा मानला जातो. शाळेच्या प्रवेशासह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा बँकेच्या व्यवहारासाठी आधार कार्ड असणे खूप गरजेचे आहे. मात्र राज्यात तब्बल 25 लाख 30 हजार 218 विद्यार्थ्याचे आधार कार्ड अवैध असल्याची बाब समोर आली आहे. आमदार मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेत विचारलेल्या लेखी प्रश्नाला शिक्षण विभागाने उत्तर देताना ही माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याने त्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. आधारकार्ड अपडेट (Aadhar Card Update) होण्यासाठी वेळ लागत असल्याचे विद्यार्थी म्हणत आहे. सरकारकडून डिसेंबर अखेरपर्यंत आधार अपडेट करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. मात्र आधार अपडेट व्हायला वेळ लागत असल्याने विद्यार्थी चिंतेत आहे. आधार अपडेट करण्याची मुदत उद्या संपत आहे. त्यामुळे आता आधारकार्ड अपडेट नसलेल्या मुलांचं पुढं काय हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे.
राज्यात गाजलेल्या बोगस पटपडताळणी प्रकरणानंतर 3 जुलै 2015 रोजी राज्य शासनाने या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरळ प्रणालीचा वापर केला. त्यात, शाळेतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी आधार कार्डद्वारे करण्यात आली. बोगस विद्यार्थी संख्येला आळा बसेल असा त्यामागील उद्देश होता.
आधारकार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक नोंदीचे अद्यावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दहा वर्षांनी आधार ईकेवायसी (EKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आधारकार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यांनी आपल्या नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. शासनाच्यावतीने देशभर नागरिकांच्या आधारकार्ड नोंदणीची मोहिम मोठया प्रमाणावर राबविण्यात आली शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार दहा वर्षानी आधारकार्ड अपडेट (Aadhar Card Update) करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हयातील ज्या नागरिकांचा आधार नोंदणी करुन दहा वर्ष इतका कालावधी पूर्ण झाला आहे. उद्या मुदत संपल्यावर आता आधार अपडेट नसलेल्या मुलांचं पुढं काय हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे.
संबंधित बातम्या:
No Confidence Motion : अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव, मविआत ताळमेळ नसल्याचं उघड; दादा म्हणाले मला माहितच नाही, नियम काय सांगतो?