Nashik CTET Exam : तीन वेळा तारखा पुढे ढकलल्यानंतर पुन्हा एकदा डीएड (Ded), बीएड च्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. डीएड, बीएड आणि केंद्र सरकारची सीटीईटी (CTET) परीक्षा देणाऱ्या हजारो परिक्षार्थी समोर पेच प्रसंग उभा राहिला असून एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. परीक्षांना प्रविष्ट होणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे केंद्र सरकारने सीटीईटी परीक्षेची तारीख बदलण्याची नाशिकच्या विद्यार्थ्यांनी मागणी होत आहे. 


राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात येणारी डीएड च्या परीक्षा 3 वेळा पुढे ढकलल्यानंतर 10 जानेवारी पासून होत आहे. 10 ते 18 तारखेपर्यंत या परीक्षा होत असतानाच त्याच दरम्यान सेन्ट्रल टीचर एलिजीबीटी टेस्ट अर्थात सीटीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक ही जाहीर झालं आहे. काही विद्यार्थ्यांची 13 जानेवारी तर काहींची 17 जानेवारीला सीटीईटीची परिक्षा आहे. दोन्ही परीक्षांचा वेळ साधारण एकच असून परिक्षा केंद्र मात्र लांब असल्याने परिक्षा देणारे विद्यार्थी संभ्रमात आहेत. डिएडच्या दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थीना ही सीटीईटी परीक्षा देता येत असल्याने हजारोच्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट आहेत. या प्रविष्ट होणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे केंद्र सरकारने सीटीईटी परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी होत आहे. 


डीएड बीएडच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात मात्र त्याच वेळी केंद्र सरकारची सेंट्रल टीचर एजिबिलिटी टेस्ट म्हणजे सीटीईटी या परीक्षेच्या देखील तारखा जाहीर झालेल्या आहेत. मात्र या दोन्ही पेपर एकाच दिवशी म्हणजे 17 जानेवारीला आल्यामुळे अनेक विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना कालच सीटीईटीच्या परीक्षांच्या प्रवेश पत्र उपलब्ध झालेले आहे. एनसीटीईच्या वेबसाईटवर तारखा जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे स्थिती निर्माण झालेली आहे. सीटीईटीच्या परीक्षा 10 जानेवारी पासून होत असून यासाठी देखील हजारो विद्यार्थी बसणार असून दोन्ही परीक्षेला विद्यार्थी बसतील असे नियोजन करण्याची विनंती विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे. 


दरम्यान पेचप्रसंगी विद्यार्थी म्हणाले कि, दोन वेळा परीक्षा स्थगित झाली असून आता पुन्हा स्थगित व्हायला नको. सिटीईटीच्या परिक्षेमुळे डीएड परीक्षा स्थगित नको, वेळेत बदल करून विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार नाही अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. कारण सीटीईटीच्या अर्जप्रक्रियेदरम्यान शेवटच्या दिवशी अर्ज भरताना महाराष्ट्रात एकाही केंद्रावर जागा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज केला असल्याने लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. सीटीएटी आणि डीएड पहिल्या वर्षाचा पेपर एकाच दिवशी एकाच वेळेला आलं असून सीटीईटीचा पेपर 9 ते 12 तर डीएडचा पहिल्या वर्षाचा पेपर 11 ते 1 असा आहे. तर दोन्ही पेपर 13 तारखेला असल्याने नेमका कोण पेपर सोडवायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी घेण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावर शिक्षक होण्याची पात्रता मिळवण्या करिताच्या या परीक्षेला शिक्षक हजेरी लावत आहेत. संगणकावर आधारित असलेली ही परीक्षा देशभरात 7 फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहे. सीटीईटी परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज मागवले होते. जारी केलेल्या वेळापत्रकानुसार डिसेंबर व जानेवारी महिन्यात संगणकावर आधारित ही परीक्षा घेतली जात आहे. दरम्यान देशभरातील 21 शहरातील केंद्रांवर ही परीक्षा होत असून नाशिक जिल्ह्यासह जळगाव धुळे व जिल्ह्यात परीक्षा केंद्र आहे. पहिल्या टप्प्यात 28 आणि 29 असे दोन दिवस परीक्षा घेण्यात आली. पुढील टप्प्यात नऊ जानेवारीपासून 7 फेब्रुवारी कालावधीमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.