एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री; पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष

Devendra Fadnavis-Ajit Pawar govt : माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळ आजही चर्चेचा विषय आहे.

Devendra Fadnavis-Ajit Pawar govt : माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळ आजही चर्चेचा विषय आहे. या शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. राज भवनात हा शपथविधी पार पडला होता. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या युतीने देशभरात खळबळ माजवली होती. अडीच दिवस टिकलेल्या या सरकारची सर्वत्र चर्चा झाली. अल्पवधीतीच सरकार कोसळलं अन् यामुळे देवेंद्र फडणवीस यांना टीकेचा सामना करावा लागला. आजही फडणवीस यांच्या मनात ही सल कायम आहे. जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी करुन चूक केल्याचं बोलून दाखवलं आहे. 

23 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला होता. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार स्थापन करण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हाताशी धरुन पहाटेच शपथविधी कार्यक्रम केला होता. राज भवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण फक्त अडीच दिवसात हे सरकार कोसळलं. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराचे बंड मोडून काढले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या पाठीशी असणारी ताकद कमी झाली अन् पहाटेचा शपथविधी पार पडलेलं सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे अखेर फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. या घटनेनंतर फडणवीस यांना टीकेचा सामना करावा लागला होता.

नेमकं काय झाले होते?
23 नोव्हेंबर, 2019 ची पहाट उगवली ती एक धक्कादायक राजकीय बातमी घेऊन. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिल्याची त्या बातमीने राजकीय वर्तुळात हल्ला माजला. पण ही खेळी नंतर फसलीच. आज त्या फसलेल्या शपथविधीला आज दोन वर्ष झाली.  प्रचारादरम्यान मी पुन्हा येणार...अशी गर्जना देवेंद्र फडणवीसांनी घेषणा केली होती. आपणच मुख्यमंत्री होणार, याबाबत फडणवीसांना अपेक्षा होती. राज्यात दीडशे जागा मिळणार असे भाजप नेते सांगत होते. पण त्यांना 105 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 145 आमदारांची आवश्यकता होती. भाजपने 152 जागा लढल्या होत्या. सत्तेतले त्यांचे भागिदार शिवसेनेने 124 जागी उमेदवार दिले होते. तर एनडीएतल्या मित्र पक्षांनी 12 जागा लढवल्या होत्या. शिवसेनेचे 56 उमेदवार निवडून आले. शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठीची रस्सीखेच सुरु झाली. ठरल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्री होईल, असा दावा शिवसेनेनं केला. भाजपनं आम्हाला शब्द दिला होता, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. पण आपण असा शब्दच दिला नव्हता, असं भाजपकडून सांगण्यात आलं. हे सर्व सुरु असताना शरद पवार यांच्या नेतृत्वात नव्या समिकरणाची निर्मिती झाली. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी चाचपणी सुरु झाली. हे सर्व सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना हाताशी धरुन पहाटे शपथविधी उरकला. पण हे सरकार फार काळ तग धरु शकलं नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. देवेंद्र फडणवीस यांना अवघ्या 80 तासांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10  AM :14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10AM: 14 May 2024: ABP MajhaTOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
Embed widget