एक्स्प्लोर
बघून थुंकल्याचा जाब विचारल्याचा राग, तरुणाला तलवार, हॉकी स्टिकने मारहाण
आरोपी काल मुशरीफ दुरुगकरकडे जाणीवपूर्वक बघून थुंकले होते. याचाच जाब मुशरीफने आरोपींना विचारला होता. जाब विचारल्यामुळेच आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप मुशरीफ दुरुगकरने केला आहे.

सोलापूर : बघून थुंकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली आहे. सोलापुरातल्या किडवाई चौकातील संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेची काही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. या हल्ल्यात मुशरीफ दुरुगकर हा तरुण जखमी झाला आहे.
मुशरीफ आपल्या मित्रांसोबत किडवाई चौकातील एका हॉटेलमध्ये बसला होता. त्यावेळी आरोपी सोहेल आडते, फरहान आडते, रिझवान आडते हे आपल्या मित्रांसोबत तलवार तसंच हॉकी स्टिक घेऊन तिथे आले आणि मुशरीफला मारहणा करायला सुरुवात केली. मुशरीफला सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्याच्या मित्रालाही दुखापत झाली.
आरोपी आणि फिर्यादी यांच्यात याआधीही भांडण झालं होतं. आरोपी काल मुशरीफ दुरुगकरकडे जाणीवपूर्वक बघून थुंकले होते. याचाच जाब मुशरीफने आरोपींना विचारला होता. जाब विचारल्यामुळेच आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप मुशरीफ दुरुगकरने केला आहे.
भर रस्त्यात ही थरारक घटना सुरु असताना अनेकांनी भीतीपोटी तिथून पळ काढला. नातेवाईकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
