नागपूर: आगामी 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात होणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या आज नागपुरात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. काल महामंडळाची स्थळ निवड समिती वर्ध्याला जाऊन आली होती. त्यांनी सुचवल्याप्रमाणे आता हे साहित्य संमेलन वर्ध्यात होणार आहे.
त्यानुसार 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्यात यावे असे विदर्भ साहित्य संघाने सुचविले होते. त्या अनुषंगाने 96 वे महामंडळाच्या स्थळ निवड समितीने वर्ध्याला भेट दिली, तिथली मैदान आणि वाहन तळ ची पाहणी केली. ती योग्य असल्याचे पाहून स्थळ निवड समितीने वर्ध्यात पुढचे साहित्य संमेलन घेण्यात यावे अशी शिफारस केली. त्यानुसार अखिल भारतीय साहित्य महामंडळाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्याचे निश्चित केले आहे.
वर्ध्यातील स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर हे साहित्य संमेलन पार पडणार आहे.. या संमेलनाच्या तारखा अजून निश्चित झालेल्या नाहीत. मात्र, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान संमेलन घेण्याचे नियोजित आहे. गोव्यात होणाऱ्या मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत तारखा निश्चित होईल.
95 वे साहित्य संमेलन उदगीरमध्ये पार पडले
उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात 22 ते 24 एप्रिल दरम्यान 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्यामध्ये वीस ठराव घेण्यात आले. या सोबतच सीमा भाषिकांचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संमेलनासाठी देशभरातून साहित्यिक, लेखक आणि रसिकांनी हजेरी लावली. 155 लेखकांच्या पुस्तकांचं प्रकाशन यावेळी झाले. तर संमेलनात 216 बुकस्टॉल लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या: