94th Marathi Sahitya Sammelan :  : 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. कोरोनामुळे साहित्य संमेलनाचा  मार्च आणि नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त हुकला होता. आता डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 94 व्या साहित्य संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे सावट आलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 


94 व्या साहित्य संमेलना दरम्यान पाळावे लागणार 'हे' नियम
संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे.  ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या  50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
 
ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकता सहभाग
साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, कविकट्टा, कविसंमेलन, विविध विषयांवरील परिसंवाद , बालसाहित्य मेळावा, आणि संस्कृतिक कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम संमेलनाच्या अधिकृत सोशल मीडिया पेज , युट्यूब चॅनल आणि वेबसाईट वर लाईव्ह बघायला मिळणार आहेत. यामुळे घरी बसल्या संमेलनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल.


प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते साहित्यसंमेलनाचे उद्धाटन होणार असून विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर  उपस्थिती लावणार आहेत. तसेच संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. खगोल शास्त्रज्ञ विज्ञान लेखक जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या :