मुंबई : कोरोनाकाळात विद्यार्थ्यांसाठी खास ऑनलाइन शिक्षणाची सोय करण्यात आली होती. आता या ऑनलाइन शिक्षणाची विद्यार्थ्यांना खूप सवय झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन शिक्षणाला पसंती देताना दिसत आहेत. ब्रेनली सर्वेक्षणातून हे समोर आले आहे.
ब्रेनली सर्वेक्षणात इयत्ता सहावी ते बारावीच्या 1,500 विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. त्यांच्यापैकी 64% विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळणार नाहीत याची काळजी वाटते आहे. तर यावर्षी 51% विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा देण्यास प्राधान्य दिले आहे.
बदललेल्या शिक्षण पद्धतीचा विद्यार्थांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा अंतिम वर्षाच्या परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्वीसारखे राहिलेले नाही. हे विद्यार्थी चिंतेत दिसून येत आहेत. तसेच 55% विद्याथर्यांना चिंता आहे की, त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्यापेक्षा चांगले गुण मिळतील.
ब्रेनली इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नरसिंह जयकुमार यासंदर्भात म्हणाले, परीक्षा हा शब्द ऐकल्यावर लाखो विद्यार्थी तणावग्रस्त आणिचिंताग्रस्त होतात.त्यांच्या मनातील भीती काढून टाकणे त्यावर मात करण्यास आत्मविश्वास देणे महत्वाचे आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शंका दूर करता येतात.
सर्वेक्षणात विद्यार्थ्यांना कोणते विषय घ्यायचे आहेत, असेही विचारण्यात आले, त्यापैकी 44% विद्यार्थ्यांनी विज्ञान विषय निवडला आहे. तर 51% विद्यार्थ्यांना त्यांचा आवडीचा विषय मिळेल की नाही अशी भीती मनात आहे.
संबंधित बातम्या
Mumbai : डिजिटल साक्षरता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी मेटाची महाराष्ट्र सायबरबरोबर भागीदारी
BMC Notice To Mumbai Metro: मुंबई मेट्रो एकच्या 11 मालमत्तांना पालिकेकडून जप्तीची नोटीस
Mumbai Corona Update : मुंबईत मंगळवारी 36 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 26 जण कोरोनामुक्त
आता शरद पवार करणार यूपीएचं नेतृत्व? अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव झाला मंजूर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha