Pune News : पुण्यातील धानोरी भागात कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या (Encroachment Department) अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना आज घडली. कारवाईसाठी गेलेल्या पथकावर स्थानिकांनी हल्ला करत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे


अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण


पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाकडून धानोरीत दुपारी दीडच्या सुमारास संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये पदपथावरील, पथारी व्यावसायिक विक्रेत्यांची अतिक्रमणे ताब्यात घेण्यापासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर इमारतींना लागून केलेल्या पत्राशेड व इतर तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणांवरही जेसीबी यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. याचवेळी काही जणांनी जेसीबीवर दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पालिका अधिकारी जागेवरून दूर निघून गेले, तर जेसीबी चालकही जेसीबी सोडून निघून गेला.


नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय जेसीबीचा ताबा सोडणार नसल्याचा पवित्रा


पालिकेच्या कारवाईत झालेली नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय जेसीबी यंत्राचा ताबा सोडणार नसल्याचा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला. दरम्यान या घटनेबाबत पालिकेच्या वतीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांनी अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई होईल असं सांगितलं होतं. या प्रमाणे शहरात देखील अनेक ठिकाणी कारवाई सुरु देखील आहे.


महत्वाच्या बातम्या


राज्यभरातील दारू विक्रेत्यांना सरकारचा मोठा दिलासा, वाढीव परवाना शुल्क दर शासनाने केले कमी


Maharashtra School : राज्यातील शाळा एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ सुरु राहणार, उन्हाळी सुट्टी रद्द


Aaditya Thackeray : नाणार रिफायनरीचं काय होणार? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले...


उन्हाळी सुट्टी रद्द झाल्याने हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये सुरु राहणार, शिक्षण आयुक्तांची माहिती