Mumbai Corona Update :  मुंबईत कोरोनारुग्णांची (Mumbai Corona Update) संख्या मागील काही दिवस अतिशय कमी आढळत आहे. आज मुंबईत 36 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. काल 50 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार नवे 36 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत.


मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 300  झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.






राज्यात आज 103 रुग्णांची नोंद


महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. राज्यात सध्या  960 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 103 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 48 तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यात गेल्या 24 तासात 107 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही


राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,24,982  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के (Recovery Rate)  झाले आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,93,08,018 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,73,722 (09.93 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही करोना बाधित रुग्णाचा मृत्यू नाही, 103 नवीन रुग्ण


Crime News : कोरोना काळात लावले अनेक बोगस लग्न, राज्यात फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय


Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 1259 नवे कोरोनाबाधित, 35 जणांचा मृत्यू


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha