मुंबई : नाफेडने (NAFED ) खरेदी केलेला 50 टक्के कांदा (Onion) खराब झाला आहे. वातावरणातील बदलामुळे कांदा खराब झाल्याची माहिती नाफेडकडून देण्यात आली आहे. नाफेडने 2.5 लाख टन कांदा खरेदी केला होता. परंतु, यातील 50 टक्के कांदा खराब झालाय.  


नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात मधून कांदा खरेदी पूर्ण झाली. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक खरेदी झाली. राज्यात 16 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ, चार सहकारी संस्था यांच्या माध्यमातून या कांद्याची खरेदी झाली आहे. मागील 2021 22 या वर्षाच्या तुलनेत 50 हजार टन अधिक खरेदी पूर्ण झाली. अद्याप हा कांदा बाजारात विक्रीसाठी आणलेलाच नाही. खरेदी करून साठवलेला हा बफर स्टॉक मधील कांदा ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून किरकोळ विक्रेते पर्यंत पुरवठा केला जाणार होता. अशी घोषणा झाली होती. परंतू हा कांदा उचललाच नसल्यामुळे त्याची सड होऊन नुकसान वाढलेलं आहे.


 केंद्र सरकारने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत या वर्षासाठी 2.5 लाख टन कांदा खरेदी केला. नाफेडने हा कांदा 13 जुलैपर्यंत खरेदी केला होता. ही खरेदी शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून शिवारात झाली. हा कांदा चाळीचा ठेवलेला आहे. परंतु, वाढलेली आर्द्रता आणि वातावरणीय बदल यामुळे कांदा सडत आहे. त्यातून काळं पाणी निघत आहे. जवळपास पन्नास टक्के कांदा खराब झाल्याची माहिती आहे. 


तुला ना मला घाल कुत्र्याला अशी परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने नाफेडने खरेदी केलेला कांदा शहरी लोकांनाही योग्य दरात चांगल्या स्थितीत मिळेल का नाही हे ही सांगता येत नाही. कांद्याची दुरावस्था ही सहा महीन्यापूर्वी साठवून ठेवलेल्या उन्नाळ कांद्याची झाली आहे. या वर्षी निसर्गाच्या लहरीपना, बदलेते हवामान आणइ अतिवृष्टीमुळे तो खराब होत आहे. तसेच नवीन खरीप कांद्याची लागवड देखील कमी होत आहे. त्याचा परिणाम पुढील हंगामात लागवड कमी त्यामुळे उत्तपादन घटवल्याशिवाय राहनार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी दिलीय.  


महत्वाच्या बातम्या


Agriculture News : मान्सून निरोप घेणार! शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं? कोणत्या पिकांची काढणी करावी? 


Aditya Thackeray In Talegaon : मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीत गेले, महाराष्ट्रासाठी नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल