Maharashtra District Guardian Ministers : अखेर जवळपास तीन महिन्यानंतर महाराष्ट्राला पालकमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याहीचं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं नाही. दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर आणि  कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. 


राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पालकमंत्र्यावर शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. अजित पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले आणि आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदे सरकारला पालकमंत्र्यावरुन खडे बोल सुनावले होते. अखेर आज शिंदे सरकारनं पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. 


जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:
देवेंद्र फडणवीस - नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली


राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया 
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव
 दादा भुसे- नाशिक
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
 सुरेश खाडे- सांगली
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार- हिंगोली
दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर
अतुल सावे - जालना, बीड
शंभूराज देसाई - सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर


भाजपकडे किती जिल्हे?
भाजपकडे 21 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्याचं पालकमंत्री आलेय. मुंबई उपनगर, जालना, बीड, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, धुळे, लातूर, नांदेड, नंदुरबार, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली


15 जिल्हे शिंदे गटाकडे - 
15 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या जबाबदारी शिंदे गटाला मिळाली आहे.  सातारा, ठाणे, मुंबई शहर ,  कोल्हापूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, रत्नागिरी, रायगड,औरंगाबाद, यवतमाळ, वाशिम, नाशिक, बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे शिंदे गटाकडे आले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Cyber frauds : चीनी माफियांकडून भारतीय तरूणांची फसवणूक, नोकरीच्या आमिषाने म्यानमारच्या जंगलात छळ 
अंकिता भंडारी हत्या प्रकरण, आरोपी पुलिकत आर्यच्या वडिलांची भाजपमधून हकालपट्टी