एक्स्प्लोर
पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, श्रीरामपूर बंदची हाक
अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात एका पाच वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आले असुन या चिमुकलीचा उपचारापुर्वीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे सामाजिक संघटनांनी श्रीरामपूर बंदची हाक दिली आहे.
श्रीरामपूर : माणुसकीला काळीमा फासणारी घटना अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. येथील एका पाच वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आले असुन या चिमुकलीचा उपचारापुर्वीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे श्रीरामपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांनी श्रीरामपूर बंदची हाक दिली आहे.
पाच वर्षीय पीडित मुलगी दुपारी 1 वाजता घराबाहेर खेळायला गेली होती. घरी आल्यानंतर ती मुलगी चक्कर येऊन खाली पडली. तिची अवस्था पाहुन तिच्या पालकांनी तिला श्रीरामपुर येथील कामगार रुग्णालयात नेले. परंतु उपचारापुर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. मुलीच्या शरीरावर जखमा असून अधिक वैद्यकीय तपासानंतर मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अत्याचार करणाऱ्या नराधामाला फाशी द्यावी, अशी मागणी पीडित मुलीच्या वडीलांनी केली आहे. दरम्यान अत्याचार करणाऱ्या नराधामाला अटक करण्याची मागणी मुलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली आहे. आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा मुलीच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement