एक्स्प्लोर

नागपुरात ट्रक चालकाला अमानुष मारहाण करणाऱ्या युवा सेनेच्या नेत्यासह चार जणांना अटक

नागपुरात ट्रक चालकाला छताला उलटा लटकवून मारहाण करण्यात आल्याचा एक व्हिडीओ काल व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत पाच जणांना अटक केली आहे.

नागपुर : नागपूरच्या वडधामना परिसरात विक्की आगलावे या ट्रक चालकाला मारहाण करणाऱ्या युवा सेनेच्या नेत्यासह त्याच्या इतर चार सहकाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील एका ट्रक ड्रायवरचा अमानवीय छळ करत त्याला जबर मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या घटनेतील पीडित ट्रक चालकाच्या तक्रारीनंतर त्याला जबर मारहाण करत अमानुष अत्याचार करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेनेने ही या प्रकाराला आक्षेपार्ह म्हणत मुख्य आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ट्रक चालकाला मारहाणीचा व्हिडीओ नागपूरच्या वडधामना परिसरातील आंध्रा-कर्नाटक रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या कार्यालयातील असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला होता. त्यानंतर पीडित ट्रक चालकाच्या तक्रारीवरुन वाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरुणाला छतावरील पंख्याच्या हुकला दोरीने लटकवून लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोबतच सदर तरुणासोबत अमानवीय कृत्य देखील केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. माहितीनुसार, संबंधित ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या मालकाने म्हणजेच अखिल पोहनकरने चार दिवसांपूर्वी पीडित ट्रक ड्रायव्हर विक्की सुनील आगलावे (23) ला ट्रकमध्ये लोड केलेले साहित्य थिरुवनंतपुरमला पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती. त्यासाठी विक्की आगलावेला रस्त्यातील टोल आणि इतर खर्चासाठी 35 हजार रोख रक्कम दिली होती. शिवाय 12 हजार रुपयांचे डिझेलही भरून दिले होते. मात्र विक्की आगलावेने ट्रक थिरुवनंतपुरमला न नेता नागपुरातच सर्व पैसे खर्च केले. शिवाय ट्रकमधले 12 हजारांचे डिझेलही कुणालातरी विकून मालकासोबत दगाबाजी केली, असा आरोप मालकाने केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर अखिल पोहनकरला त्याच्या चालकाच्या या कृत्याचा इतका राग आला की चार दिवसाने विक्की हाती लागताच त्याला कार्यालयात छताला उलटं लटकवून जबर मारहाण केली. तिथे उपस्थित इतर लोकांनी या कृत्याचे व्हिडीओ बनविले. नंतर हे व्हिडीओ व्हायरल होऊन पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करत अखिल पोहनकर, अमित ठाकरे, प्रकाश चवरे, श्रीराम इकनकर आणि चंद्रशेखर परसमोड या पाच आरोपीना अटक केली आहे. पब्जी खेळण्यास विरोध केल्याने महिलेला ठाकुर्लीमध्ये मारहाण

महत्त्वाच्या बातम्या

ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget