Western Ghat : हवामान बदलाचे प्रत्यक्ष अनुभव महाराष्ट्रातील शेतकरी घेत असतानाच पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून एकूण 388 गावे वगळण्यात येणार आहेत. यामध्य रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. यासाठी सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत भास्कर जाधव यांच्या लक्षवेधीवर दिली. (388 villages will be excluded from the sensitive area of the Western Ghats)
गावे वगळण्यासाठी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, कोकण, पश्चिम घाट आणि चंद्रपूर, गडचिरोली हे पर्यावरण व वने सांभाळणारे त्याग करणारे प्रदेश आहेत. मात्र, पर्यावरणाची जबाबदारी राज्यात फक्त आपल्यावरच आहे का? असे या भागातील जनतेला वाटू नये. या भागांना काही प्रोत्साहनपर सवलती द्यायला हव्या. पश्चिम घाटात अधिसूचित केलेल्या गावांमध्ये उद्योग येणार नसतील, तर त्यांना वेगळ्या काही सवलती द्याव्या लागतील. त्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा केली जाईल.
दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात 2018 मध्ये ही 388 गावे पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. मात्र, ठाकरे सरकारने ती संख्या कमी करून केवळ 22 वर आणली होती. आता पुन्हा बैठका घेऊन केंद्राकडे 388 गावे वगळण्याचा सुधारित प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, राज्याने पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्राचे एमआरसॅटद्वारे उपग्रह सर्वेक्षण करून घेतले आहे, अधिसूचनेत अंतर्भूत करण्याकरिता प्रस्तावित प्रत्येक गावांपर्यंत प्रशासन पोचले आणि त्यांच्या ग्रामसभा घेऊन संवाद निर्माण केला. समस्या समजावून घेऊन पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याच्या गावांची सूची तयार केली गेली.
युनेस्कोकडून पश्चिम घाटाचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश
हिमालय पर्वतांपेक्षा जुनी, पश्चिम घाटाची पर्वत शृंखला अनन्य जैवभौतिक आणि पर्यावरणीय प्रक्रियांसह अत्यंत महत्त्वाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचे प्रतिनिधित्व करते. उच्च पर्वतीय वन परिसंस्था भारतीय मान्सून हवामान पद्धतीवर प्रभाव पाडतात. प्रदेशाच्या उष्णकटिबंधीय हवामानाचे संयम राखून, मान्सून प्रणालीचे एक उत्कृष्ट उदाहरण सादर करते. यात जैविक विविधता आणि स्थानिकता यांचा अपवादात्मक उच्च स्तर आहे आणि जैविक विविधतेच्या जगातील आठ 'उत्तम हॉटस्पॉट्स' पैकी एक म्हणून ओळखले जाते. साईटच्या जंगलांमध्ये कोठेही नॉन-विषुववृत्तीय उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांचे काही सर्वोत्तम प्रतिनिधी समाविष्ट आहेत आणि कमीतकमी 325 जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या वनस्पती, प्राणी, पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि माशांच्या प्रजाती आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या