mahaegram citizen connet : महाराष्ट्र सरकारकडून अधिकाधिक ऑनलाईन सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. डिजिटल सात बारा सुर झाल्याने अनेकांच्या तलाठी कार्यालयातील फेऱ्या कमी झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारकडून mahaegram citizen connet या मोबाईल अॅपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीशी निगडीत असणाऱ्या सर्व सुविधा ऑनलाईन करून गाववाल्यांना मोठी भेट दिली आहे. त्यामुळे mahaegram citizen connet या अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थांना सर्व दाखले ऑनलाईन पद्धतीने मिळवता येणार आहेत.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट mahaegram citizen connet नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन अॅप लाॅच केलं आहे. mahaegram citizen connet या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या गावातील गावठाणमधील जागेचा उतारा, ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, ग्रामपंचायत सदस्यांची माहिती, यापूर्वी कराचा भरणा केलेल्या सर्व कराच्या रकमेची माहिती सुद्धा आपल्या या अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे.
आपल्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप इंस्टाॅल केल्यानंतर ग्रामस्थ घरबसल्या गावच्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले आरामात काढू शकतात. त्यामुळे वेळेची चांगलीच बचत होणार आहे. दाखल्यासाठी ग्रामपंचायतीकडे फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. दुसरीकडे, ग्रामपंचायतीला या माध्यमातून घरफाळा वसूली करणे सोपं झालं आहे.
आपले सरकार सुविधा
अॅपमध्ये आपले सरकार सुविधा नावाचा पर्याय असून यामध्येही केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येत असलेल्या सुविधांची एकाच ठिकाणी माहिती देण्यात आली आहे.
mahaegram citizen connet अॅपमधून कोणते दाखले मिळतील?
- जन्म व मृत्यू प्रमाणपत्र
- दारिद्ररेषेखालील प्रमाणपत्र
- नमुना ८, असेसमेंट उतारा
- घरफाळा
- ग्रामपंचायत सदस्यांची माहिती
- विवाह नोंदणी
mahaegram citizen connet इन्स्टाॅल कराल?
- मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरमध्ये mahaegram citizen connet सर्च करा
- यानंतर पहिल्यांदाच आपल्याला mahaegram citizen connet अॅप दिसेल
- mahaegram citizen connet अॅप डाऊनलोड करा
- डाऊनलोड केल्यानंतर काय कराल?
- mahaegram citizen connet अॅप ओपन करा
- अॅप ओपन केल्यानंतर तुमचे पूर्ण नाव टाका
- त्यानंतर लिंग जो असेल तो निवडा
- त्यानंतर आपली जन्मतारीख भरा
- यानंतर आपला मोबाईल नंबर भरा
- सर्वात शेवटी ईमेल आयडी भरा
- वरील माहिती भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
- यानंतर आपल्याला मोबाईलवर युझर आयडी आणि पासवर्ड येईल.
- यानंतर mahaegram citizen connet अॅप वापरण्यास सक्षम झाला आहात.
इतर महत्वाच्या बातम्या