एक्स्प्लोर
कोल्हापुरात 33 लाखांच्या जुन्या नोटा जप्त, दोघांना अटक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या नाकाबंदीत जवळपास 33 लाखांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. पाचशे आणि हजारच्या नोटांचा यात समावेश आहे. या सर्व नोटा जप्त करत दोघांना ताब्यात घेण्यात आलं.
गडहिंग्लजजवळील बसर्गे गावात ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या नाकाबंदीत ही रक्कम सापडली आहे. याप्रकरणी एका कारसह आनंदा पाटील आणि आडव्यापा मटपती या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा कुठून आणि कशा आल्या याचा गडहिंग्लज पोलीस तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघा व्यक्तींची कसून चौकशी सुरु आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement