29 March Headlines : काँग्रेसचे देशभरात आजपासून जय भारत सत्याग्रह, शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात; आज दिवसभरात...
28 March Headlines : देशभरात काँग्रेसचे 'जय भारत' सत्याग्रह सुरू होणार आहे. तर, आज मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिबिराला शरद पवार संबोधित करणार आहेत.
28 March Headlines : राहुल गांधी यांच्या समर्थनात आणि मोदी-अदानींच्या हितसंबंधाच्या मुद्यावरून आजपासून देशभरात काँग्रेसचे जय भारत सत्याग्रह सुरू होणार आहे. तर, आज मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिबिराला शरद पवार संबोधित करणार आहेत.
दिल्ली
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टामध्ये आज सकाळी प्रकरण मेन्शन केलं जाण्याची शक्यता. त्यानंतर सुनावणीची नवी तारीख निश्चित होईल. 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भात ही सुनावणी होणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही
- राहुल गांधींच्या समर्थनार्थ आणि देशाची लूट थांबवण्यासाठी मोदी अदानी हितसंबंधांबाबत निर्भीडपणे प्रश्न विचारण्यासाठी काँग्रेसचा जय भारत सत्याग्रह आजपासून सुरू होणार आहे. 8 एप्रिल पर्यंत देशभरात काँग्रेस वेगवेगळे राबवणार आहे.
- पालघरमधील 2 साधू आणि ड्रायव्हर हत्याप्रकरणाची चौकशी CBI ला देण्याच्या मागणीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
चंद्रपूर
- अयोध्या येथील निर्माणाधीन राममंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या सागवनाचे आज बल्लारपूर येथे काष्टपूजन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शोभायात्रेच्या स्वरूपात सागवानाची लाकडे चंद्रपुरात आणली जाणार.
शिर्डी
- आजपासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला होणार प्रारंभ होणार आहे. पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे.
पुणे
- शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात आज पोलीस तक्रार करण्याची शक्यता आहे.
मुंबई
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील चेंबुरमध्ये सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्यावतीने चेंबूरमध्ये युवा मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित तरुणांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.
- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्य एन एम जोशी मार्ग, वरळी पोलिस स्थानकात दुपारी 3 वाजता जाणार आहेत. यावेळी किशोरी पेडणेकर कुटुंबियांसंबंधित असलेली किश कॉर्पोरेट कंपनीने बेस्ट ड्रायव्हर/ कामगारांचा पगार आणि पीएफ बुडविला असा भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप आहे
- महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या एसआरए घोटाळा प्रकरणी दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
- पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
नागपूर
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या नेतृत्वात आज व्हेरायटी चौक येथील गांधी चौक ते संविधान चौक दरम्यान काँग्रेस पक्षाचा लॉंग मार्च निघणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व ज्या पद्धतीने रद्द करण्यात आले त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग
- भाजप आमदार नितेश राणे यांची कणकवली प्रहार भवन येथे दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना ( शिंदे गट) आणि भाजप यांची संयुक्त पत्रकार परिषद असणार आहे.
नाशिक
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर असून ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. कांदा उत्पादक शेतकरीची भेट घेण्याची शक्यता आहे.
वाशिम
- पोहरादेवी इथं आज भारत राष्ट्र समिती पक्षाची विदर्भातील पहिली सभा होणार आहे. त्यामध्ये तेलंगाना राज्यातील एक-दोन मंत्री उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. अनेक पक्ष बदलून BRS मध्ये प्रवेश घेतलेले माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे.