एक्स्प्लोर
महाविकासआघाडीच्या 26 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्र्यांकडून शपथ
देवेंद्र फडणवीसांबरोबर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राजकीय भूकंप घडवणाऱ्या अजित पवारांनी, ठाकरे सरकारमधल्या उपमुख्यमंत्रिपदाचीही शपथ घेतली. मंत्र्यांची यादी तयार करताना अनुभवी आणि नवीन चेहरे यांचा समतोल राखलेला दिसतोय.
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर महाराष्ट्राला पूर्ण मंत्रिमंडळ मिळाल आहे. आज ठाकरे सरकारचा पहिला आणि संपूर्ण क्षमतेचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून 26 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीसांबरोबर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राजकीय भूकंप घडवणाऱ्या अजित पवारांनी, ठाकरे सरकारमधल्या उपमुख्यमंत्रिपदाचीही शपथ घेतली. मंत्र्यांची यादी तयार करताना अनुभवी आणि नवीन चेहरे यांचा समतोल राखलेला दिसतोय. आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे या तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तर मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप देत विदर्भ आणि इतर काही प्रांतावर अन्याय झाल्याचा सूर ऐकयाला मिळत आहे.
शिवसेनेकडून या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अनिल परब (मुंबई)
उदय सामंत (रत्नागिरी)
गुलाबराव पाटील (जळगाव)
दादा भुसे (मालेगाव, नाशिक)
संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ)
संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद)
शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद)
राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर)
शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा)
बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती)
काँग्रेसमधून या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
के.सी.पाडवी (धुळे) (अक्कलकुवा, नंदुरबार)
अशोक चव्हाण (नांदेड)
अमित देशमुख (लातूर)
यशोमती ठाकूर (अमरावती)
विजय वड्डेटीवार (चंद्रपूर)
सुनील केदार (नागपूर)
अस्लम शेख (मुंबई)
वर्षा गायकवाड (मुंबई)
सतेज पाटील (राज्यमंत्री) (कोल्हापूर)
विश्वजित कदम (राज्यमंत्री) (सांगली)
Cabinet Expansion | मी शपथ घेतो की... | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ | ABP Majha
राष्ट्रवादीचे या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अजित पवार (उपमुख्यमंत्री) (बारामती, पुणे)
दिलीप वळसे पाटील (आंबेगाव, पुणे)
धनंजय मुंडे (परळी, बीड)
अनिल देशमुख (नागपूर)
डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखे़ड राजा, बुलडाणा)
हसन मुश्रीफ (कागल, कोल्हापूर)
जितेंद्र आव्हाड (ठाणे)
नवाब मलिक (मुंबई)
बाळासाहेब पाटील (कराड, सातारा)
राजेश टोपे (अंबड, जालना)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) (अहमदनगर)
दत्ता भरणे (राज्यमंत्री) (इंदापूर)
अदिती तटकरे (राज्यमंत्री) (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री) (उदगीर, लातूर)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement