एक्स्प्लोर

Dipali Sayyed : रुपाली चाकणकराचा नाव, फोटो अन् स्टाईलवर ट्रेडमार्क; आ बैल मुझे मार... त्यांचा सल्लागार कोण आहे? दिपाली सय्यद यांचा सवाल, बायकांच्या साडीचाही विषय काढला

Dipali Sayyed : आता जस्ट पाच नोव्हेंबरला तुम्ही अर्ज केलेला आहे आणि त्याला अजूनही स्क्रुटनी झालेली नाहीये, परमिशन मिळालेली नाहीये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी स्वतःचा ट्रेडमार्क त्यांचे व्यक्तिगत कॉपी राइट्स आरक्षित केले आहेत. रुपाली चाकणकरांचं नाव, त्यांचा फोटो, त्यांची ओळख, आणि त्यांची वैयक्तिक शैली आणि त्यांची स्वतःला सादर करण्याची विशिष्ट पद्धत आता ट्रेडमार्क असेल आणि त्याची नोंदणी (Rupali Chakankar Trademark) त्यांनी केली आहे. रुपाली चाकणकरांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आपल्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो, ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक (Rupali Chakankar Trademark) कारणासाठी करु नये असं आवाहन त्यांनी केलंय. कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ, फिल्म, रील, टीझर, प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी, वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास, अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.(Rupali Chakankar Trademark) त्यावरती आता अभिनेत्री दिपाली सय्यदने प्रतिक्रिया दिली आहे.

दिपाली सय्यदने (Dipali Sayyed) म्हटलंय की, आणखी एकदा आ बैल मुझे मार, ट्रेडमार्क कसला, आता जस्ट पाच नोव्हेंबरला तुम्ही अर्ज केलेला आहे आणि त्याला अजूनही स्क्रुटनी झालेली नाहीये, परमिशन मिळालेली नाहीये. म्हणजे महाराष्ट्रात जितक्या बायका साड्या नेसतायत, त्यांनी साड्या नेसायच्या नाहीत का? ह्या महाराष्ट्र ज्या गावात मी आहे, लोणावळ्यात आज मी उभी आहे, तिथे या गावातच कितीतरी रूपाली नावाच्या व्यक्ती मुली असतील. म्हणजे त्यांनी ते ते नाव लावायचं नाही का? म्हणजे काय हा कोण आहे तुमचं सल्लागार? हे खूप कुठे ना कुठे तरी चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. पुन्हा एकदा तुम्ही तेच सिद्ध करताय की आ बैल मुझे मार. 

मी एक कलाकार आहे, मी कलाकार म्हणून काम केलेलं आहे आणि मी एक पोलिटिशियन लेडीचं काम केलेलं आहे आणि मी ते साकारलेलं आहे. तुम्हीच म्हणताय की ती मी आहे, मी आहे, मी आहे. मी आज कितीतरी वर्षांपासून हा क्लिप लावते, कितीतरी वर्षांपासून मी साड्या नेसते. म्हणजे याचा अर्थ ती व्यक्ती मीच झाली का? असं नाही ना कितीतरी, कोणीही घालू शकतात. पुन्हा सांगते मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगते का हा विषय भोंदूगिरी विरोधात आहे. भोंदूगिरीला कुठे ना कुठेतरी स्टॉप करायचा आहे आणि हे पुन्हा महाराष्ट्रात घडू नये, पुन्हा महिला या सगळ्या गोष्टीला बळी पडू नये. ही जी जनजागृती आहे तेवढंच आहे आणि हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये. कोणीही स्टॉप करू शकत नाही येण्यासाठी. तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला त्रास देताय आजही ह्या विषयाला घेऊन तुम्ही प्रोपोगंडा करता आहेत. पुन्हा सेन्सॉरमध्ये त्रास चालू झालेला आहे. हा जो त्रास तुम्ही देता आणि हा त्रास भोगतोय आम्ही. आम्ही तरीही देखील ताठपणाने उभे आहोत आणि ताठपणाने सांगतो की चित्रपट चित्रपट गृहात येणार आणि तो महाराष्ट्रभर पसरणार, असा ठाम विश्वासही दिपाली सय्यदने व्यक्त केला आहे.

रूपाली चाकणकरांची पोस्ट काय?

माझे नाव,माझा फोटो,माझी ओळख,माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे. माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो,ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो,व्हिडिओ, फिल्म,रील,टीझर,प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी,वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास,अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल.

अशातच दिग्दर्शक स्वरुप सावंत यांच्या महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, याच पार्श्वभूमीवर चाकणकरांचा स्वतःचा ट्रेडमार्क चर्चेत आला आहे. महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स  चित्रपटात एक व्यक्तिरेखा रुपाली चाकणकरांशी साधर्म्य साधणारी आहे असं सांगितलं जातंय. या सर्व बाबतीत महाराष्ट्र एपस्टीन फाइल्सचे दिग्दर्शक स्वरुप सावंत यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.

Swaroop Sawant : सिनेमा पूर्णपणे काल्पनिक आहे - स्वरुप सावंत

पहिली गोष्ट हा सिनेमा आम्ही पूर्णपणे काल्पनिक बनवलेला आहे, मी नेहमी माझ्या मुलाखतीमध्ये सांगत असतो, समाजात घडलेलं प्रतिबिंब सिनेमांमध्ये आम्ही दाखवत असतो, समाजात घडणाऱ्या गोष्टींचा प्रतिबिंब हा सिनेमा असतो, आणि मी माझ्या सिनेमातून ज्या सत्या घटना आहेत. त्यावरून प्रेरित होऊन मी चित्रपट बनवतो, समाजाला प्रबोधित करण्यासाठी तर हा सिनेमा आम्ही सत्य घटनेने प्रेरित होऊन बनवला आहे, सिनेमा पूर्णपणे काल्पनिक आहे, त्या गोष्टीवर कोणी ऑब्जेक्शन नसावं असं मला वाटतं आहे, एक सोशल मेसेज देण्यासाठी मी हा सिनेमा बनवला आहे, समाजाला काहीतरी प्रबोधित करण्यासाठी मी हा सिनेमा बनवला आहे, तर जे आत्ता तुम्ही म्हणत आहात ते काही खरं वाटत नाही तो निव्वळ योगायोग आहे, असंही महाराष्ट्र एपस्टीन फाइल्सचे दिग्दर्शक स्वरुप सावंत यांनी म्हटलं आहे.

Swaroop Sawant : थोरात गॅंगचे आम्हाला फोन येत आहेत -स्वरुप सावंत

पहिली गोष्ट मी जसं बोललो तसं आपला सिनेमा हा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि रूपालीताई चाकणकर यांना ही गोष्ट करायची गरजच नव्हती, म्हणजे तुमच्या काही गोष्टी आहेत का? तुम्हाला भीती आहे का? आमच्या सिनेमांमध्ये असतील त्या गोष्टीची तुम्हाला भीती आहे का? म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी करत आहात का? आम्हाला नोटीस आली होती, 25 कोटीची, त्या नोटीसला उत्तर दिलं, आमच्या लीगल टीमने, आता बाकी भरपूर गोष्टी आहेत, जसं थोरात गॅंगचे आम्हाला फोन येत आहेत, लोकांचे फोन येत आहेत, नाव थोरात देऊ नका, महाराष्ट्र नाव हटवण्यासाठी वेगवेगळ्या फोन येत आहेत, त्याचबरोबर आणखी काही प्रकार चालू आहेत, त्यामुळे तुमच्या खरंच काही गोष्टी आहेत का? तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टीत पिक्चर न येण्यासाठी इतका त्रास देत आहात असा सवालही स्वरूप सावंत यांनी उपस्थित केला आहे 

Swaroop Sawant :  20 तारखेला सिनेमा रिलीज होईल याची शक्यता कमी -स्वरुप सावंत

सेन्सर बोर्डात आमचा थोडासा टेक्निकल इशू असल्यामुळे आमचं सबमिशन लेट झालं, मी आतापर्यंत सहा-सात सिनेमा केले आहेत, दरवेळी मी सेन्सर बोर्डात रिक्वेस्ट करायला जातो आणि ते सेन्सर करून देतात, रिलीज डेट आपली डिक्लेअर केलेली असते तेव्हा, यावेळी मी गेलो होतो सेन्सर बोर्डामध्ये रिक्वेस्ट करायला मी आणि आमचे निर्माते, आम्ही दोघे सेन्सर बॉर्डर गेलो होतो, रिक्वेस्ट करायला तर तिथून आम्हाला असं आलं की, पहिले ते आमच्यावर चिडून बोलले, हे तुम्ही आत्ता नका करू, आमच्याकडंन होणार नाही, आम्हाला मिनिस्ट्रीवरून प्रेशर आहे असे शब्द त्यांच्याकडून आले, त्यानंतर त्यांच्याकडून हे पण आलं की, आपल्या रूपालीताई चाकणकर त्या तीन-चार दिवस झाले सेन्सर बोर्डात येऊन बसत आहेत, ते असेही आम्हाला बोलले, ही गोष्ट चुकीची आहे, खरंतर त्यांचे कनेक्ट जास्त आहेत की आमचे कनेक्ट जास्त आहेत, आम्ही कनेक्शनसाठी सिनेमे बनवत नाही आम्ही समाज प्रबोधन करण्यासाठी सिनेमे बनवत आहोत, तिथून अशा गोष्टी आल्या की, ताईचे कनेक्ट जास्त आहेत, की आमचे कनेक्ट जास्त आहेत, असा सेन्सर बोर्डाने बोललं नाही पाहिजे, त्या व्यक्तींनी असं बोललं नाही पाहिजे, तर रूपाली ताई तिकडे जाऊन बसत आहेत, त्यांनी असं आम्हाला सांगितलं, आम्ही काहीही अश्लील असं सिनेमात दाखवलेलं नाही, आमचा सिनेमा UA सर्टिफाइड होईल एवढा छान सिनेमा बनवला आहे, सेन्सर बोर्डाने तो सिनेमा बघावा आणि मग ठरवावं सेन्सर द्यावं की नाही, आधी स्क्रीनिंग लावली पाहिजे बोर्डाने, त्यासाठी प्रेशर केलं जात आहे, आम्ही लढतोय सिनेमा रिलीज होण्यासाठी, 20 तारखेला सिनेमा रिलीज होईल याची शक्यता कमी आहे, कारण आमचा स्क्रीनिंग लावलेलं नाही दबावामुळे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
Rupali Chakankar Trademark: रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
Rupali Patil Thombare : ट्रेडमार्कवरून ठोंबरे चाकणकर आमनेसामने; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांच्या दाव्यावर सवाल, कायदेशीर बाबी मांडत दिलं आव्हान, म्हणाल्या, 'परत राजकारणात...'
ट्रेडमार्कवरून ठोंबरे चाकणकर आमनेसामने; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांच्या दाव्यावर सवाल, कायदेशीर बाबी मांडत दिलं आव्हान, म्हणाल्या, 'परत राजकारणात...'
IND vs NZ 5th ODI : अर्शदीपचा वेग, सिराजचा कहर आणि अक्षरचा चक्रव्यूह! भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवलं; पाचव्या सामन्यासह मालिकाही जिंकली
अर्शदीपचा वेग, सिराजचा कहर आणि अक्षरचा चक्रव्यूह! भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवलं; पाचव्या सामन्यासह मालिकाही जिंकली
मराठमोळे महेश भागवत 'हैदराबादचे पोलीस आयुक्त'; पाथर्डीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी, नांगरे पाटलांची खास पोस्ट
मराठमोळे महेश भागवत 'हैदराबादचे पोलीस आयुक्त'; पाथर्डीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी, नांगरे पाटलांची खास पोस्ट
Rupali Chakankar Trademark: रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
मुंबईतील CSMT स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ई-मेल येताच पोलिसांकडून डॉगस्कॉडसह पाहणी
मुंबईतील CSMT स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ई-मेल येताच पोलिसांकडून डॉगस्कॉडसह पाहणी
PM Modi: 'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
Embed widget