एक्स्प्लोर
वीज पडून दोन मेंढपाळाचा मृत्यू, 39 मेंढ्या दगावल्या
जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथे वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील दोन मेंढपाळांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे, त्याचबरोबर या मेंढपाळांच्या 39 मेंढ्यादेखील दगावल्या आहेत.

परभणी : जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथे वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील दोन मेंढपाळांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच या मेंढपाळांच्या तब्बल 39 मेंढ्या यावेळी दगावल्या आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पाथरी परिसरात काल रात्री वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडला, अंधापुरी येथील चंद्रकांत मोरे यांच्या शेतात बीडमधल्या धारुर तालुक्यातील मेंढपाळ वास्तव्यास होते. पावसाने चांगलाच जोर धरलेला असल्यामुळे तीन मेंढपाळ आणि त्यांच्या शेळ्या असे सर्वजण झाडाखाली बसले होते. त्यावेळी मेंढपाळांसह शेळ्यांवर वीज कोसळली. या दुर्घटनेत सीताराम काळे (35), कृष्णा शिंदे (17) या दोन मेंढपाळांचा जागीच मृत्यू झाला तर रामभाऊ शिंदे हा एक जण जखमी जखमी झाला आहे. या मेंढपाळांच्या 39 मेंढ्या या घटनेत दगावल्या आहेत.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















