एक्स्प्लोर

एमआयएमच्या आमदारासह 164 जणांना तीन वर्षे महानगर पालिका निवडणूक लढण्यास बंदी

धुळे महानगर पालिकेची डिसेंबर 2018 मध्ये निवडणूक झाली. यासाठी 356 उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यात सादर करायचा होता.

धुळे : धुळे महानगरपालिकेच्या 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खर्चाचा तपशील वेळेत सादर न केल्यामुळे 164 उमेदवारांना पुढील तीन वर्षे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यास अपात्र अर्थात अनर्हतेची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केली आहे. त्यात धुळे शहराचे एमआयएमचे विद्यमान आमदार फारुख शहा व तसेच भाजपाचे स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदे यांसह काही माजी नगरसेवकांचा देखील समावेश आहे. ही अपात्रता आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच 6 फेब्रुवारी 2020 पासून लागू करण्यात आली आहे . 6 फेब्रुवारी 2020 ला हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. धुळे महानगर पालिकेची डिसेंबर 2018 मध्ये निवडणूक झाली. यासाठी 356 उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यात सादर करायचा होता. त्यानुसार 167 उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. या उमेदवारांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे नोटीस बजावून खुलासा सादर करण्याची मुदत दिली होती. त्यासाठी वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. यात 164 जणांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मनपा कलम 10 (1 ई) अन्वये 164 जणांवर अनर्हतेची (अपात्र ) कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधितांना सदस्य म्हणून निवडणुकीस उभे राहण्यास तीन वर्षासाठी अनर्ह (अपात्र ) केले आहे. Special Report | भंडाऱ्यातल्या मिरच्या दुबईच्या बाजारात, पाच मित्रांच्या स्टार्टअपमुळे शेतकरी सुखात | ABP Majha धुळे महानगरपालिका निवडणुकीत विद्यमान आमदार फारुख शहा यांनी प्रभाग क्रमांक 13 अ मधून उमेदवारी केली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर भाजपाचे सोनल शिंदे हे सध्या स्वीकृत नगरसेवक म्हणून आहे. अनर्हतेची कारवाई झालेल्यांमध्ये तत्कालीन महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती माधुरी अजळकर, माजी सभागृह नेता अरशद शेख, माजी नगरसेवक रमेश बोरसे यांच्यासह इतरांचा यात समावेश आहे. नाशिक विभागीय आयुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे धुळ्यात राजकीय गोटात खळबळ माजली आहे. या संदर्भात धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शाह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण मुंबईत एका बैठकीत व्यस्त असल्याचं सांगत अधिक बोलण्याचं टाळलं आहे. संबंधित बातम्या:  धुळे महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget