एक्स्प्लोर

16 मंडळं, 168 तास अखंड भजन, गोंदियातली 150 वर्षे जुनी परंपरा

खेडशिवणी गावात सर्वधर्मसमभावाने 16 मंडळं एकत्र येतात आणि मातेचा अखंडपणे गजर केला जातो. यंदा 168 तास भजन सोहळा उत्साहात पार पडला

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील खोडशिवणी या गावात नवरात्रौत्सवादरम्यान एक अनोखी परंपरा गेल्या 150 हून अधिक वर्षांपासून जपली जातेय. खेडशिवणी गावातील या परंपरेनुसार 16 मंडळं एकत्र येतात आणि मातेचा अखंडपणे गजर केला जातो. यंदा 168 तास भजन सोहळा उत्साहात पार पडला. भक्तीसह सर्वधर्म समभावाचा संदेशही या माध्यमातून दिला जातो. दरवर्षी खेडशिवणी गावातील प्राचीन हनुमान मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी मंदिरात ज्योत प्रज्वलित करुन हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येतो. तर घटस्थापनेच्या दिवसापासून तर ज्योती विसर्जनपर्यंत विविध भजन मंडळांतर्फे कुठलेही खंड न पडता दिवस रात्र येथे भजन गायलं जातं. या ठिकाणी 16 भजन मंडळ असून प्रत्येक भजन मंडळाला भजनासाठी दीड तासांचा अवधी दिला जातो. त्या भजन मंडळाचा अवधी संपताच, खंड न पडू देता दुसरे भजन मंडळ आपले भजन गाण्यास सुरुवात करतं. असे एकूण सात दिवसात तब्बल 168 तास भजन होतं. 16 मंडळं, 168 तास अखंड भजन, गोंदियातली 150 वर्षे जुनी परंपरा 16 भजनी मंडळांचा माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून या गावात अनोखी परंपरा सुरु असून, या सप्ताहादरम्यान गावातील वातावरण भक्तीमय होत असते. शिवाय गावात अन्य ठिकाणी कुठलीही पूजाअर्चना होत नाही. या उत्सवात गावातील महिलावर्ग मोठ्या हिरिरीने भाग घेत गावात स्वच्छता करुन रांगोळी काढून मंदिर परिसराची सजावट करत असतात. भजन मंडळांचे मंदिरातील भजन आटोपल्यानंतर गावातील प्रत्येक गल्लोगल्लीतून हे भजन मंडळ फिरुन या भक्तीमय वातावरणात आणखीच भर पाडीत असतात. त्यामुळे ही परंपरा अशीच पिढ्यांपिढ्या अशीच सुरु राहावी, अशी भावना या गावकऱ्यांची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget