एक्स्प्लोर
बीडमधील रेल्वे रुळाच्या 150 चाव्या अज्ञाताने काढल्या!
बीड : राज्यात पुन्हा एकदा रेल्वे रुळांवर घातपाताचा प्रयत्न उघडकीस आला आहे. बीडमधील परळी-हैदराबाद रेल्वे रुळाच्या 125 ते 150 चाव्या अज्ञातांनी काढल्या. परळी रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर ही घटना उघडकीस आली.
रेल्वे रुळाच्या पॅकिंगसाठी या चाव्या लावलेल्या असतात. त्या काढल्यानं मोठा अनर्थ होऊ शकला असता. मात्र, रेल्वे रुळांवरील सव्वाशे ते दीडशे चाव्या काढलेल्या गँगमनच्या लक्षात आलं. त्यानंतर त्या पुन्हा बसवण्यात आल्या. गँगमनच्या सतर्कतेमुळे मोठा घातपात टळला.
याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे एवढ्या सगळ्या चाव्या एक व्यक्ती काढू शकत नाही. त्यामुळे यात एकापेक्षा अनेकांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement