चाकूरच्या प्रशिक्षण केंद्रातून 137 जवान देशाच्या सीमेवर
देशातील विविध भागांतील बीएसएफच्या शहीद जवानांच्या 127 मुलांनी हे प्रशिक्षण घेत घराचा देशसेवेचा वारसा पुढे नेला आहे.
लातूर : चाकूर येथील बी. एस.एफ प्रशिक्षण केंद्रातून 137 जवान हे देशाच्या सीमेवर सुरक्षतेसाठी रवाना होणार आहेत. यातील विशेष बाब ही देशातील विविध भागांतील बीएसएफच्या शहीद जवानांच्या 127 मुलांनी हे प्रशिक्षण घेत घराचा देशसेवेचा वारसा पुढे नेला आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरुवारी दीक्षांत समारंभ पार पडला.
लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे बी. एस.एफ प्रशिक्षण केंद्र आहे. यंदा 44 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण करून 137 जवान हे आता देशाच्या सीमवेर रुजू होणार आहेत. प्रशिक्षण केंद्राच्या मैदानात हा दीक्षांत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
चाकूर येथील प्रशिक्षण केंद्रात या जवानांना गेल्या 44 आठवड्यापासून प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आज दीक्षांत कार्यक्रम पार पडला. यावेळी आय. जी. जी .एस. मलिक यांनी जवानांना कर्तव्य बाजावण्याबाबत शपथ दिली. या दीक्षांत समारंभात जवानांचे परिवार देखील सहभागी झाले होते. संदीप राऊत यांनी प्रशिक्षण दिले आहे. शिवाय हे जवान आता पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर कर्तव्य बाजवणार आहेत. येथील प्रशिक्षण केंद्रातील सोई- सुविधा ह्या उत्तम असल्याचेही बीएसएफ चे आय जी जी. एस. मलिक यांनी सांगितले.