एक्स्प्लोर
Advertisement
नागपूरच्या वेणा जलाशयात 11 तरुण बुडाले, बुडण्यापूर्वी तरुणांचं फेसबुक लाईव्ह!
नागपूर : नागपूरच्या वेणा जलाशयात रविवारी 11 तरुण बुडाले आहेत. यातील तीन तरुणांना वाचवण्यात यश आलं आहे, यात दोन नाविकांसह एक पर्यटक तरुणाचा समावेश आहे. तसंच दोन मृतदेहही सापडले आहेत. उर्वरित तरुणांचा शोध अद्याप सुरु आहे. बोट उलटल्यानं हे सर्व 11 जण पाण्यात बुडाले. बोट उलटण्यापूर्वी या तरुणांनी फेसबुक लाईव्हही केलं होतं.
काल संध्याकाळी ही दुर्घटना घडली असून संध्याकाळी अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं. आज सकाळी पाच वाजता मदतकार्य सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र सात वाजले तरी ते सुरु झालं नव्हतं.
नागपुरातील 11 तरुण सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी वेणा जलाशयावर गेले होते. त्यावेळी हे तरुण नावेत बसून जलाशयात गेले, मात्र अधिक वजन झाल्यानं ही नाव पलटली असा अंदाज वर्तवला जात आहे. आजूबाजूला काम करणाऱ्या या माहिती कळाल्यानंतर त्यांनी ही माहिती पोलीस प्रशासनाला दिली.
या नावेतला अतुल ज्ञानेश्वर बावणे सोडून इतर कुणालाही पोहता येत नसल्याने अतुल वगळता सर्वच्या सर्व पाण्यात बुडाले. अतुल कसा बसा पोहत काठावर आला.
जलाशयात मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या मदतीने लगेच बचावकार्य सुरू करण्यात आलं. कोळी बांधवांनी रात्री 9.30 पर्यंत एकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मात्र, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. आज सकाळी दुसरा मृतदेह हाती लागला आहे.
काय घडलं नेमकं?
नागपुरातील 11 तरुण सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी वेणा जलाशयावर गेले होते. त्यावेळी हे तरुण नावेत बसून जलाशयात गेले, मात्र अधिक वजन झाल्यानं ही नाव पलटली. यातील तिघांना वाचवण्यात यश आलं आहे.
हे सर्व तरुण 25 ते 30 वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. जलाशयात फेरफटका मारताना त्यांनी फेसबुक लाईव्हही केलं. यात त्यांनी बोटीमध्ये पाणी येत असल्याचं बोललं आहे. तसंच आपल्यापैकी कुणालाच पोहता येत नाही, शिकलो असतो तर बरं झालं असतं, असंही म्हणाले आहेत. त्यामुळे बोट नेमकी कशामुळे उलटली याचाही शोध सुरु आहे.
रात्री 9.30 पर्यंत शोधमोहिम सुरु होती, मात्र अंधारामुळे ही शोधमोहिम थांबवण्यात आली. सकाळी 7 वाजेपर्यंत मदतकार्य सुरु झालं नव्हतं.
बुडण्यापूर्वी त्यांनी केलं फेसबुक लाईव्ह
बोट उलटण्यापूर्वी या तरुणांनी फेसबुक लाईव्ह केलं. यात त्यांनी आपण मस्त एन्जॉय करत असल्याचं सांगितलं. तसंच आपल्यापैकी कुणालाच पोहता येत नसल्याचं सांगितलं. फेसबुक लाईव्हमध्ये दिसणारा आनंद मात्र काही काळच टिकला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement