एक्स्प्लोर

राज्यात 11 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्याची घोषणा

राज्यात भंडारा, गडचिरोली, रामटेक, बुलडाणा, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी या ठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा क्रेंद्र उभारण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : 'पासपोर्ट आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्या अंतर्गत महाराष्ट्रात 11 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला ही माहिती दिली. या नवीन केंद्रांसह राज्यात पासपोर्ट सेवा केंद्रांची एकूण संख्या 36 होणार आहे. राज्यात भंडारा, गडचिरोली, रामटेक, बुलडाणा, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी या ठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा क्रेंद्र उभारण्यात येणार आहेत. नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने 'पासपोर्ट आपल्या दारी' या कार्यक्रमा अंतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी 2017 मध्ये देशभरात 289 पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. टप्याटप्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असून देशभरात आतापर्यंत 218 पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार देशभरात 87 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 11 नवीन केंद्र उभारण्यात येणार असल्याचं डॉ. मुळे यांनी सांगितलं. पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात 25 पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. यापैकी आतापर्यंत 14 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. तर 4 सप्टेंबर 2018 रोजी बारामतीत नवीन केंद्राची सुरुवात होणार असल्याचं डॉ. मुळे यांनी सांगितलं. गेल्या दीड वर्षात सुरु झालेल्या 14 नवीन पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली, कोल्हापूर, सातारा, घाटकोपर-विक्रोळी,  पिंपरी-चिंचवड, पंढरपूर, नांदेड, सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे. या नवीन केंद्रांद्वारे पासपोर्ट वितरणाचे कार्यही सुरु झाले आहे. बारामतीत 4 सप्टेंबर रोजी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असून त्यानंतर अकोला, अमरावती, चंद्रपूर, डोंबिवली, लातूर, माढा, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, नवी मुंबई, पनवेल याठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याच्या दिशेने कामांना सुरुवात होणार आहे

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Embed widget