एक्स्प्लोर

भूमीहीन दलितांना शेतजमीन घेण्यासाठी 100 टक्के अनुदान

शेतजमीन खरेदी करण्यासाठी आता चार एकर कोरडवाहूसाठी 20 लाख तर दोन एकर बागायती शेतीसाठी 16 लाख रूपये देण्याचा आणि या रकमेवर तब्बल 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई : अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतजमीन खरेदी करण्यासाठी आता चार एकर कोरडवाहूसाठी 20 लाख तर दोन एकर बागायती शेतीसाठी 16 लाख रूपये देण्याचा आणि या रकमेवर तब्बल 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राबवण्यात येते. मात्र चार एकर कोरडवाहू जमीन प्रत्येकी तीन लाख रुपयांप्रमाणे किंवा दोन एकर बागायती जमीन राज्यात कुठेही उपलब्ध होत नाही. शिवाय पूर्वीच्या योजनेत लाभार्थ्याला सामाजिक न्याय विभागाकडून 50 टक्के अनुदान तर 50 टक्के कर्ज देण्याची योजना होती. मात्र इतक्या कमी किंमतीने शेत जमीन मिळणं कठीण होतं. त्यामुळे योजना चांगली असूनही या घटकांच्या आर्थिक उन्नतीच्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत होता. राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांपैकी 95 टक्के लोक भूमीहीन तर उर्वरीत अल्पभूधारक आहेत. त्यामुळे त्यांना शेतीच्या रोजंदारीवरच अवलंबून रहावं लागतं. मात्र शेतीवरील कामेही वर्षातील काही महिनेच उपलब्ध असल्यामुळे या घटकांच्या मूलभूत प्राथमिक गरजाही पूर्ण करण्यात अडचणी येतात. त्यामुळे त्यांना शेतीचे साधन उपलब्ध झालं तर त्यांचा आर्थिक विकास होईल, शिवाय त्यांच्या भावी पिढीची सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक प्रगतीही होण्यास हातभार लागेल, असं मत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केलं. नवीन निर्णयाप्रमाणे भूमीहीन अनुसूचित जाती आणि नवबौद्ध लाभार्थ्याला उत्पन्नाचं साधन म्हणून शेतजमीन खरेदी करता येईल. यासाठी चार एकर कोरडवाहू जमिनीसाठी प्रति एकर पाच लाख रुपयांप्रमाणे असे एकूण 20 लाख रुपये तर आठ लाख रूपये प्रति एकर प्रमाणे दोन एकर बागायती शेतजमीन खरेदी करण्यासाठी 16 लाख रुपयांचे थेट अनुदान देण्यात येईल. म्हणजे यातून भूमीहीन लाभार्थ्यांचा खऱ्या अर्थाने विकास होईल, असं सांगत बडोले यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
Beed Vaidyanatha Temple: राष्ट्रीय सुरक्षा पथक बीडमधील वैजनाथाच्या मंदिरात धडकलं, सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
राष्ट्रीय सुरक्षा पथक बीडमधील वैजनाथाच्या मंदिरात धडकलं, सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
Embed widget