एक्स्प्लोर

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्वरीत 10 आमदारांचं निलंबन मागे

मुंबई: अर्थसंकल्पादरम्यान विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी बराच गदारोळ घातला होता. त्यावेळी 19 आमदारांचं निलंबनही करण्यात आलं होतं. त्यानंतर एक एप्रिलला 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं. विधानसभेत निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर तो मंजूरही करण्यात आला. यावेळी बोलताना गिरीश बापट म्हणाले की, 'विरोधी पक्षांच्या सूचनांवर विचार करुन सरकार काम करतं. त्यामुळे भविष्यात राज्यातील शेतकरी नक्की कर्जमुक्त करु. पण आपण लोकशाहीची परंपरा अबाधित ठेवली पाहिजे.' असं म्हणत बापट यांनी आमदार निलंबनाचा रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. उर्वरित दहा आमदारांचं निलंबन मागे: 1. अमर काळे - काँग्रेस, आर्वी, वर्धा 2. भास्कर जाधव – राष्ट्रवादी, गुहागर , रत्नागिरी 3. विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर 4. मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी 5. हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा 6. कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण 7. जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा 8. राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर 9. जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे 10. संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर 1 एप्रिलला या 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं. 1. संग्राम थोपटे  काँग्रेस, भोर, पुणे 2. दीपक चव्हाण राष्ट्रवादी, फलटण – सातारा 3. दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे 4. अवधूत तटकरे राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड 5. अमित झनक काँग्रेस, रिसोड, वाशिम 6. वैभव पिचड राष्ट्रवादी, अकोले – अहमदनगर 7. डी.पी सावंत काँग्रेस, नांदेड उत्तर 8. नरहरी जिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेस  दिंडोरी, नाशिक 9. अब्दुल सत्तार काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद काय आहे नेमकं प्रकरण? अर्थसंकल्पादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं 22 मार्चला 9 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. यामध्ये काँग्रेसच्या 9 आणि राष्ट्रवादीच्या 10 आमदारांचा समावेश होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, काँग्रेसचे अब्दुल्ल सत्तार यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश होता. या सर्वांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात यावं, असा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिला होता. तो मान्य करण्यात आला होता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 18 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे  असे आरोप ठेवून या आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. संबंधित बातम्या: जितेंद्र आव्हाडांसह 19 आमदार 9 महिन्यांसाठी निलंबित 19 आमदारांचं निलंबन : कोण काय म्हणालं? निलंबित आमदारांच्या यादीतून 2 नावं ऐनवेळी वगळली मतदानाच्या भीतीने 19 आमदारांचं निलंबन?

…म्हणून मोजून 19 आमदारांचं निलंबन : पृथ्वीराज चव्हाण

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Nagpur Accident: ई-बाईक खड्ड्यातून उसळली, अंजली थेट दुभाजकावर आदळली; तेवढ्यात मागून येणाऱ्या नागपूर मनपाच्या इलेक्ट्रिक बसनं चिरडलं, जागीच दुदैवी अंत
ई-बाईक खड्ड्यातून उसळली, अंजली थेट दुभाजकावर आदळली; तेवढ्यात मागून येणाऱ्या नागपूर मनपाच्या इलेक्ट्रिक बसनं चिरडलं, जागीच दुदैवी अंत
Abdul Sattar Meet Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची सत्तारांसमोर एकनाथ शिंदेंबाबत तक्रार; अब्दुल सत्तार म्हणाले, 'मी मित्र म्हणून आलोय', नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंची सत्तारांसमोर एकनाथ शिंदेंबाबत तक्रार; अब्दुल सत्तार म्हणाले, 'मी मित्र म्हणून आलोय', नेमकं काय घडलं?
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Embed widget