एक्स्प्लोर
कोल्हापुरात भरधाव कारने महिलेला चिरडलं
कोल्हापूर : कोल्हापुरातील हिट अँड रनची घटना घडली. भरधाव कारने एका महिलेसह पाच जणांना उडवलं. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य जखमी झाले आहेत.
दाभोळकर कॉर्नर ते न्यू शाहूपुरी रोड या परिसरात काल रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने 5 दुचाकींना उडवलं. दुचाकींचा चक्काचूर झाला, तर तिथून पळ काढण्यात चालक यशस्वी झाला.
दरम्यान या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारची गाडीची तोडफोड केली. शाहूपुरी पोलिस या कार चालकाचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement