एक्स्प्लोर

12 हजार कोटींच्या पाणीपुरवठा योजनांना स्थगिती, माजी मंत्री लोणीकरांचा आरोप तर नगरविकासचा निधीही थांबवला

एक हजार कोटी रुपयांच्या कामांना यापूर्वीच तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. ती देखील या कामात थांबली असल्याचे लोणीकरांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत सन 2019 20 या वर्षात राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून 12 हजार कोटींचा आराखडा मंजूर झालेला आहे. या कामांना स्थगिती दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप सरकारच्या काळातील अनेक योजनांना ब्रेक लावला जात आहे. यातच राज्यातील 12 हजार कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांना राज्य सरकारने स्थगिती दिली असल्याचा आरोप माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. दुसरीकडे नगरविकास खात्याच्या विविध विकास कामांना दिलेला निधी देखील थांबवला आहे. ज्या कामांना कार्यारंभ आदेश नव्हते अशी कामं थांबविण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने 50-50 टक्के निधी खर्च करून राज्यातलया ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना सुरू होणार होत्या. त्याला राज्य सरकारने स्थगिती दिली. पुन्हा नव्या तांत्रिक मान्यतेचा कारण सांगून ही स्थगिती दिल्यामुळं राज्याचं खूप मोठं नुकसान झाल्याचा आरोप लोणीकरांनी केला आहे. सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या कामांना यापूर्वीच तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. ती देखील या कामात थांबली असल्याचे लोणीकरांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत सन 2019 20 या वर्षात राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून 12 हजार कोटींचा आराखडा मंजूर झालेला आहे. या कामांना स्थगिती दिली आहे. अति तात्काळ असा उल्लेख असलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे सर्व टेंडर थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. नगरविकास खात्याच्या विविध विकास कामांना दिलेला निधी देखील थांबवला आहे. ज्या कामांना कार्यारंभ आदेश नव्हते अशी कामं थांबविण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. ज्या विकासकामांना काम सुरू करायचे आदेश होते. त्याची यादी उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कळवायला सांगितली आहे. हे आदेश सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. 12 हजार कोटींच्या पाणीपुरवठा योजनांना स्थगिती, माजी मंत्री लोणीकरांचा आरोप तर नगरविकासचा निधीही थांबवला भाजप सरकारच्या काळातील कामांना स्थगितीचे आदेश याआधीही भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील विकासकामांचा समावेश आहे. या कामांना दोन कोटींपासून 25 कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळालं होतं. भाजप सरकारच्या काळात ही कामं मंजूर झाली होती. मात्र कामांचं वाटप करताना सरकारने पक्षपातीपणा केल्याचा आरोप तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केला आहे. बहुतांश कामं ही भाजपच्या आमदारांना मिळाल्याचा दावा त्यांचा आहे. त्यामुळे कार्यारंभाला मंजुरी न दिलेल्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. कोणत्या कामांना स्थगिती? - ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे - कोकण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गतील कामं - ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकासाची कामं - यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम - या अंतर्गत मंजूर झालेल्या 2019-20 सालातील कामांना स्थगिती देण्याचे आदेश - या योजनेअंतर्गत अजूनही कार्यआरंभ मंजुरी न दिलेल्या कामांना स्थगिती देण्याचा आदेश संबंधित बातम्या आरे कारशेडनंतर ठाकरे सरकार बुलेट ट्रेन प्रकल्पही रोखणार? आरे कारशेडला स्थगिती, मेट्रोला नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 October 2026: आज नवरात्रीचा पाचवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा पाचवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
IND vs WI 4th T20 Highlights : सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget