एक्स्प्लोर

2020च्या सरकारी कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर ते कॅलेंडर जुने, विधिमंडळाचा दावा

विधिमंडळाच्या 2020च्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला आहे. हे कॅलेंडर आधीच छापण्यात आलं होतं का की सत्ताबदल होऊनदेखील त्यात सुधारणा करण्यात आल्या नाहीत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

मुंबई : भाजपसोबतची युती तोडून शिवसेना सत्तेत सहभागी झाली. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. पण विधिमंडळाच्या 2020च्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो छापण्यात आला आहे. एकट्या फडणवीसांचाच नाही तर जुन्याच मंत्रिमंडळातील सदस्यांचे देखील फोटो या कॅलेंडरवर आहेत. त्यामुळं सरकार बदललं असलं तरी त्याची खबरबात प्रशासनाला नाही का, असा सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान हे कॅलेंडर मी पुन्हा येईन असा विश्वास असणाऱ्यांनी छापलं होतं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तर विधीमंडळाकडून हे कॅलेंडर जुनं असल्याचं सांगण्यात आलं आहे. विधानमंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार सन 2019 च्या कॅलेन्डरमध्ये एक महिना जादा जानेवारी 2020 चा छापला आहे. त्यामुळे ते फोटो त्यावेळी म्हणजे जानेवारी 2019 मध्ये छापले आहेत. सन 2020 च्या कॅलेन्डर चे मुद्रण अद्यापही झालेले नाही. ते प्रुफ स्टेजला आहे, असे विधानभवन प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या कॅलेंडरवर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री दाखवण्यात आलं आहे. जानेवारी 2020 चे कॅलेंडरचे पेज आहे मात्र त्यावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून हरिभाऊ बागडे यांचा फोटो छापण्यात आला आहे. या कॅलेंडरवर राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दाखवण्यात आलं आहे. बऱ्याच राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र 2020 च्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात आले आहेत याचाही कॅलेंडर छापणाऱ्यांना पत्ता नाही. कारण त्यांचा उल्लेख विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आला आहे. तर धनंजय मुंडे हे सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र त्यांना कॅलेंडरवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दाखवण्यात आलं आहे. संबंधित बातम्या  तान्हाजीच्या दृश्यांवर मॉर्फिंग, शिवराय मोदी तर तान्हाजी अमित शहा; दिल्ली निवडणुकीपूर्वी व्हिडीओ व्हायरल  Tanhaji Spoof Video | छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेचं समर्थन नाही, वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी भाजपच्या राम कदमांची प्रतिक्रिया Tanhaji Political Spoof | तान्हाजीच्या पॉलिटिकल व्हिडीओमुळे संभाजीराजे छत्रपती आक्रमक, व्यक्तिरेखांना मोदी, शाहांचे चेहरे लावल्याने वाद

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
Mumbai Ranji Trophy Squad : उपकर्णधार OUT, सूर्यकुमार यादवची एन्ट्री होणार?; 22 वर्षांचा खेळाडूही आघाडीवर, मुंबईच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष
उपकर्णधार OUT, सूर्यकुमार यादवची एन्ट्री होणार?; 22 वर्षांचा खेळाडूही आघाडीवर, मुंबईच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष
‘तेलाचा डबा अडीच हजारांचा, अशी मदत केल्यापेक्षा मेलेलं बरं’ दुष्काळाच्या सरकारच्या मदतीवर शेतकऱ्यांचा रोष
‘तेलाचा डबा अडीच हजारांचा, अशी मदत केल्यापेक्षा मेलेलं बरं’ दुष्काळाच्या सरकारच्या मदतीवर शेतकऱ्यांचा रोष
WTC Points Table : WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने भारताची कोंडी; न्यूझीलंडची भरारी, टीम इंडिया कुठे अडकली?
WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने भारताची कोंडी; न्यूझीलंडची भरारी, टीम इंडिया कुठे अडकली?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Embed widget