Maharashtra Lok Sabha Elections Result 2024 : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातून पहिला कल हाती लागला आहे.
नाशिक, रावेरमधून कोण आघाडीवर?
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत होत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात पोस्टल मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आघाडी घेतली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात प्रमुख लढत होत असून पोस्टल मतमोजणीत रावेरमधून रक्षा खडसे यांनी आघाडी घेतली आहे.
नंदुरबार, जळगाव, दिंडोरीतून कोण आघाडीवर?
तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार हिना गावित तर महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यात लढत होत असून महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी आघाडी घेतली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या लढत होत असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी आघाडी घेतली आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यात लढत होत असून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे आघाडीवर आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या लढत होत असून डॉ. सुभाष भामरे हे सध्या आघाडीवर आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यात लढत असून सध्या भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
जळगाव लोकसभा
करण पवार - 14477
स्मिता वाघ - 29702
स्मिता वाघ आघाडीवर
रावेर लोकसभा
रक्षा खडसे - 21790
श्रीराम पाटील - 14219
रक्षा खडसे आघाडीवर
नंदुरबार लोकसभा
पहिल्या फेरीत काँग्रेसचे गोवाल पाडवी 18500 मतांनी आघाडीवर
नाशिक लोकसभा
नाशिकमधून पहिल्या फेरी पूर्ण पहिल्या फेरीअखेर राजाभाऊ वाजे आघाडीवर.
सिन्नर, इगतपुरीमध्ये वाजे यांची आघाडी कायम आहे.
नाशिक पश्चिममध्ये तुल्यबळ लढत सुरु
इतर महत्वाच्या बातम्या