मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणी 8 वाजता सुरु होईल. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वप्रथम पोस्टल मतांची (Postal Ballot) मोजणी सुरु होईल. सुरुवातीचा पाऊण ते तासभर पोस्टल मतांची मोजणी चालेल. यावरुन थेट लोकसभा निवडणुकीच्या निकाल (Lok Sabha Election Result 2024) कळणार नसला तरी राजकीय वारं नक्की कोणत्या दिशेला वाहत आहे, याचा अंदाज पोस्टल बॅलेटच्या मतांवरुन येऊ शकतो. त्यामुळे निकालाचे प्राथमिक कल कळून येतील. पोस्टल बॅलेटसची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम यंत्रांमधील मतांची मोजणी सुरु होईल.   प्रत्येक मतदारसंघात किती मतदान झालं आहे, त्यानुसार मतमोजणीच्या फेऱ्या होतील. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय 14 टेबलवर मतमोजणी होईल. म्हणजे प्रत्येक लोकसभेत एकूण 84 टेबलवर मतमोजणी होईल. 

राज्यात नेमकी कशी मतमोजणी होईल?

महाराष्ट्रात 48 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. राज्यभरात 39 ठिकाणी 48 मतमोजणी केंद्रावर मतमोजणी होईल. यामध्ये पोस्टल बॅलेटच्या मतांचाही समावेश आहे.  महाराष्ट्रातील  48 मतदारसंघात 5 टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात एकूण 60.78 टक्के मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यात 62.71 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

85 वर्षांपुढील मतदारांची बॅलेट पेपर वरील मतदान : 54 हजार 649अत्यावश्यक सेवेतील पोस्टल मतदान : 1 लाख 26 हजार 279सीमेवरती असलेल्या सैनिकांचे मतदान : 75 हजार 970एकूण पोस्टल मतदान : दोन लाख 56 हजार 898पोस्टल मतदान मोजण्यासाठी अधिकारी : 601ईव्हीएम मशीन वरील मतदान मोजण्यासाठी अधिकारी (AROs) : 288ईव्हीएम वरील मतदान मोजण्यासाठी एकूण स्टाफ : 14,507सैनिक आणि पोस्टल मतदान मोजण्यासाठी स्टाफ : 404मतमोजणी करण्यासाठी इतर सहाय्यक अधिकारी : 567

पोस्टल बॅलेट म्हणजे काय असते?

पोस्टल बॅलेट म्हणजे टपालाद्वारे पाठवलेली मते असतात. पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे बॅलेट पेपरवर मतदान होत असे,तीच पद्धत पोस्टल बॅलेटसाठी वापरली जाते. जे मतदार त्यांच्या नोकरीमुळे आपल्या मतदारसंघात जाऊ शकत नाहीत, ते मतदार पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करतात. निवडणूक आयोग अगोदरच अशा मतदारांची संख्या निश्चित करुन त्यांना पोस्टल बॅलेट पाठवते. त्यानंतर मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करुन पोस्टल बॅलेट पोस्टाने किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने  निवडणूक अधिकाऱ्याकडे परत पाठवतो.

आणखी वाचा

माढ्याचा खासदार कोण? धैर्यशील मोहिते म्हणतात 80 हजारांनी जिंकणार, निंबाळकरांनाही मोदी करिष्म्यावर विश्वास  

मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची बाजी? देशात सत्ता कोणाची, मतमोजणीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...