एक्स्प्लोर

'कर्जमाफीस पात्र, पण वंचित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधा'

ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि बँकांची दिलेली माहिती जुळत नाही अशा शेतकऱ्यांनी माहितीची शहानिशा करण्यासाठी बँकांशी संपर्क साधण्याचं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.

मुंबई: ऑनलाईन कर्जमाफीच्या घोळानंतर अखेर सरकारला जाग आली. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीचा लाभ प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि बँकांची दिलेली माहिती जुळत नाही अशा शेतकऱ्यांनी माहितीची शहानिशा करण्यासाठी बँकांशी संपर्क साधण्याचं आवाहन देशमुख यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र अर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडील माहितीच्या आधारे कर्जमाफीचा आणि प्रोत्साहनपर लाभाचा फायदा देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीशी जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा, म्हणून शासनाने तालुकास्तरीय समिती गठित केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेत उपलब्ध करुन दिलेल्या आहेत आणि बँकांनी त्यांच्या शाखेत त्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. कर्जमाफी योजनेचा लाभ प्रलंबित असलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची अचूक माहिती आपल्या बँकेच्या शाखेत त्वरीत सादर करावी. शेतकऱ्यांसंबंधी माहितीची शहानिशा करुन त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती बँकेमार्फत करण्यात येईल. त्यानंतर तालुकास्तरीय समिती मार्फत तपासणी अंती ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येऊन, योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. सर्व संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 28 July 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मिळणार गती, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मिळणार गती, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
मुंब्र्यात अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला, 13 वर्षीय मुलीचा मृत्यू
मुंब्र्यात अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला, 13 वर्षीय मुलीचा मृत्यू
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget