Beed News :  परळीच्या महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महादेव मुडें हत्याप्रकरणी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीनंतर त्यांनी हि माहिती दिली. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, "पोलिस प्रशासनाला परळीतील धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) बंगल्यावरुन वाल्मिक कराडचा (Walmik karad) फोन आला आणि त्यांनी तपास थांबवला, असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे आपण मुख्यमंत्र्यांना दिली.  या प्रकरणात कुणीही असो, त्याला सोडणार नाही असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यांच्या शब्द म्हणजे संविधानाचा शब्द असल्याची प्रतिक्रिया देत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही खळबळजनक आरोप केले आहेत.

Continues below advertisement


100% वाल्मीक कराडने फोन करून तपास थांबवला


या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत माझ्या बाबतीत आवाज उठवला, त्याबद्दल मी त्यांची भेट घेण्याकरिता आले होते. मुख्यमंत्र्यांची देखील भेट झाली. जेव्हा हे प्रकरण झालं तेव्हापासून त्यांनी मला साथ दिलेली आहे. सुप्रिया सुळे यांचा देखील मला सपोर्ट आहे, आत्ताच त्यांनी कॉल केला होता. मला सांगितलं बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला. बंगला म्हणजे धनंजय मुंडे यांचा बंगला आहे आणि त्यावर कारभार सर्व वाल्मीक करा सांभाळतो. म्हणजे वाल्मीक कराडचा फोन गेला. म्हणजेच 100% वाल्मीक कराडने फोन करून तपास थांबवला. आता जशी मी खोलात गेले तसे मला समजले की प्लॉटच्या वादातून माझ्या नवऱ्याची हत्या झाली. ती वाल्मीक कराड यांनी घडवून आणली. असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे.


आरोपी जोपर्यंत फाशीवर जात नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार


ज्यावेळी मला डिस्टर्ब झालं त्यावेळी माझ्या वडिलांपासून निरोप आला कि, ती जमीन मी ताईच्या नावावर करतो आणि मीडिया बंद करा. माझे वडील म्हणाले तुझ्या घरातील एक माणूस मला मारू दे नंतर माझ्या ताईचं घर तुझ्या नावावर करतो तुला चालेल का? हि ऑफर आली पण आम्ही ती फेटाळली. माझं कुंकू गेला आहे. मला करोडो जरी दिले तरी माझं कुंकू परत येणार आहे का? माझं कुंकू जर परत येणार असतं तर मी त्यांची ऑफर मान्य केली असती. माझा नवरा ते परत आणून देणार आहेत का? त्यामुळे आम्ही ती ऑफर फेटाळली. आमच्या न्यायाचा जो लढा आहे तो आम्ही सातत्याने लढत राहणार. आरोपी जोपर्यंत फाशीवर जात नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. असेही ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या.


मुख्यमंत्र्यांना गुपितपने सर्व आरोपींची नावे दिली- ज्ञानेश्वरी मुंडे


ज्यावेळेस ऑफर दिली त्यावेळेस मी विष प्रशा केलं होतं. मी रुग्णालयात होते. वडिलांना विचारलं ऑफर कोणी दिली, पण त्यांनी साक्षात आम्हाला नाव सांगितलं नाही. वडील शांत बसले आणि मग आम्ही विषय सोडून दिला. आम्ही त्यानंतर मनोज जरांगे यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितला की, आम्हाला अशी ऑफर आली आहे. आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांशी तात्काळ भेट घ्यायची आहे. त्यानंतर आम्ही त्यांची भेट घेतली. आम्हाला पंकज कुमावत त्यांचे ऑर्डरकरून जर आम्हाला एसआयटी दिली तरच माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल. मी मुख्यमंत्र्यांना गुपितपने सर्व आरोपींची नावे दिली आहेत. बाळाभाऊ बांगर यांनी सर्वांना ओपनली सांगितले आहे आरोपींची नावे. मी मुख्यमंत्र्यांना सर्व नाव दिली आहेत, ही हत्या वाल्मीक कराडने घडवून आणली मी निश्चित सांगू शकते. असेही ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या.


ही बातमी वाचा: