Horoscope Today 1 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 1 ऑगस्ट 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आज ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आहे, हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज कामासाठी अचानक प्रवासाचे योग येतील, तरुण वर्ग आधुनिक विचाराने भारावून जाईल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज वडीलधाऱ्यांना तुमचे वागणे विचित्र वाटेल, त्यामुळे घरात वाद होऊ शकतात
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज बेकार तरुणांना काम मिळेल, नवीन नोकऱ्या लागतील, महिलांना आपल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो एखाद्या गोष्टींमध्ये वाहून न जाता त्याचे विश्लेषण करणे आज तुम्हाला चांगले जमेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमचा सल्ला घेण्यासाठी लोक तुमच्याकडे येतील, तुमच्या तडफदार आणि आत्मविश्वास पूर्ण वागण्यामुळे अनेक कामांचा फरशा पडाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज आरोग्याच्या तक्रारी कमी होतील, तुमच्याकडचा उत्साह इतरांनी उसना घ्यावा अशी परिस्थिती निर्माण होईल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज राजकारणातील लोकांना आपला प्रभाव जनतेवर पाडण्यासाठी उत्तम काळ आहे, सत्ता आणि मान याचे आकर्षण राहील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये अधिकाराच्या जागेवर वर्णी लागेल, जबाबदारीची कामे अंगावर पडतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज सतत काहीतरी कामे करावी लागल्यामुळे थकल्यासारखे वाटले, तरी तोंडावर कसे दाखवणार नाही
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो खेळाडू लोकांना वेगवेगळ्या संधी मिळतील, विद्यार्थी स्वतःच्या मनाप्रमाणे काम करतील .
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज वैचारिकदृष्ट्या बरेच स्थिर आणि दूरदृष्टी ठेवणारे म्हणून तुमची ख्याती होईल, आर्थिक लाभ चांगले मिळतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज मनावरचा ताण हलका होऊन जाईल, वारसा हक्काने मिळणारे इस्टेटची कामे मार्गी लागतील.
हेही वाचा :
Numerology: ऑगस्टची सुरूवात होताच 'या' जन्मतारखेच्या लोकांचे 'अच्छे दिन' सुरू, बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरला मिळणार दिशा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
