एक्स्प्लोर

वाशिममधील कारंजा बाजार समितीत शेतकऱ्यांना 5 रुपयात पोटभर जेवण

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील सर्वात जुनी बाजार समिती कारंजा येथे शेतकऱ्यांसाठी दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे या बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याच ठरत आहेत. पहिला निर्णय आहे बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ 5 रुपयात पोट भरून जेवण आणि दुसरा निर्णय म्हणजे बाजार समितीमध्ये माल आणणाऱ्या शेतकऱ्यांना कूपन दिल्या जातात. या कूपनचा लकी ड्राद्वारे वर्षातल्या शेवटी विविध इनामी योजना आखली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे शेतकरी आनंदित आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील पहिली बाजार समिती आहे. या बाजार समितीची स्थापना 1886 मध्ये झाली. पूर्वी याठिकाणी कापसाच खूप मोठा व्यापार होता. मात्र, आता दिवसेंदिवस शेती तोट्यात जात असल्याने शेतकरी आता पारंपारिक पिकांनाच पसंती देतात. त्यातही पिकवलेला माल योग्य भाव आणि तातडीने घेतल्याही जाऊ शकत नाही. सध्या नाफेडद्वारे तुरीची खरेदी अनेक ठिकाणी बंद झाली आहे. त्यामुळे आठवडा भर शेतकऱ्यांना आपल्या मालाची रखवालगिरी करावी लगत आहे. घरून डब्बा नाही आला की अनेक शेतकरी उपाशी झोपतात. मात्र, कारंजा बाजार समितीत नाफेडची खरेदी सुरु आहे. पण धीम्या गतीने ज्यामुळे शेतकऱ्यांना पाच ते सहा दिवस बाजार समितीत थांबावे लागते, अश्यावेळी दोन वेळा बाहेर जेवणासाठी जायचं म्हटल की २०० ते २५० रुपये लागतात. पण बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी यावर्षी दोन महत्वाचे निर्णय घेतले आहे. 5 रुपयांत पोटभर जेवण पहिला निर्णय आहे जो शेतकरी बाजार समितीत माल विकायला आणेल त्याला बाजार समितीमध्ये केवळ ५ रुपयात पोट भरून जेवण मिळेल. यासाठी बाजार समिती स्वत:चे 25 आणि शेतकऱ्यांचे 5 असे 30 रुपयांचं जेवण अवघ्या पाच रुपयात शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी आनंदित याठिकाणी जेवण करत आहे. या जेवणामध्ये शेतकऱ्यांना भाजी, पोळी, वरण, भात, पोळी आणि ठेचा दिल्या जाते. याठिकाणी दररोज 400 ते 500 शेतकरी अवघ्या पाच रुपयात पोट भरून जेवण करत आहे. इनामी योजना दुसरा निर्णय आहे बाजार समितीचा, तो आहे इनामी योजना. जानेवारी 2017 पासून जो शेतकरी बाजार समिती माल आणेल त्याला एक कूपन दिल्या जातील आणि वर्षातून एकदा लकीड्रॉ होईल, ज्यामध्ये पाहिले बक्षीस आहे मोठं टॅक्टर आणि सोबतच मिनी टॅक्टर. त्याचसोबत विविध शेतीउपयोगी साहित्याच बक्षीस लकीड्राद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कारंजा बाजार समिती ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याच संचालक मंडळ सांगतात. सध्या वाशिम जिल्ह्यात अनेक बाजार समितीमध्ये नाफेडची तूर खरेदी बंद आहे. ज्यामुळे मागील 10 ते 12 दिवसांपासून अनेक शेतकरी बाजार समितीतच दिवस रात्र काढत आहे. तर काही शेतकऱ्यांना उपाशी झोपावं लागतं. अशावेळी तरी बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहावे तस मात्र कुठ दिसत नाही. कारंजा बाजार समितीने सुरु केलेली 5 रुपयात पोट भरून जेवण, ही तरी सुरु केली तर नक्कीच शेतकरी थोड्या प्रमाणात का होईना पण तो नक्कीच बाजार समितीची स्तुतीच करेल.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 5th T20 : बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! थांबण्याचं नाव घेईना, टॉसही रखडला; भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! थांबण्याचं नाव घेईना, टॉसही रखडला; भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
Tukaram Mundhe : दुष्काळाकडे समस्या म्हणून पाहू नका संधी शोधा, गावातील पाणी गावात राहिलं पाहिजे यासाठी बांधबंधिस्ती करा, तुकाराम मुंढेंचा सल्ला
पाणी अडवा पाणी जिरवा, गावातील पाणी गावात राहिलं पाहिजे यासाठी बांधबंधिस्ती करा, तुकाराम मुंढेंचा सल्ला
IND Vs WI 5th T20 LIVE Score Update : टॉसची वेळ झाली, तरी नाणेफेक नाही! भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्याबाबत मोठी अपडेट, बंगळुरुमध्ये नेमकं काय घडतंय?, जाणून घ्या LIVE अपडेट
टॉसची वेळ झाली, तरी नाणेफेक नाही! भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्याबाबत मोठी अपडेट, बंगळुरुमध्ये नेमकं काय घडतंय?, जाणून घ्या LIVE अपडेट
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Embed widget