Leo Horoscope Today 22nd March 2023 : आज सिंह राशीच्या लोकांनी जिभेवर साखर ठेवणं गरजेचं; कामं झटपट होतील; आजचं राशीभविष्य
Leo Horoscope Today 22nd March 2023 : आजूबाजूला होणाऱ्या वादात अडकू नका. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
Leo Horoscope Today 22nd March 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक दिर्घकालीन आजाराने त्रस्त आहेत, त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा दिसेल. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही नवीन लोकांच्या संपर्कात याल ज्याद्वारे तुम्हाला नफा मिळून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांच्या मदतीने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. दूर राहणारे काही नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधू शकतात.
तुमच्या कोणत्याही वाईट सवयीमुळे तुमच्या प्रियकराला वाईट वाटू शकते आणि तो तुमच्यावर रागावू शकतो. आपल्या प्रियजनांची काळजी घेणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांची काळजी घेत असताना, आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्या. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठ आणि कनिष्ठांचेही सहकार्य मिळेल. तुमच्या वाणीतील गोडव्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. आकस्मिक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल
तुम्हाला तुमच्या मुलांकडून आदर मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल. आजूबाजूला होणाऱ्या वादात अडकू नका. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.
राजकीय क्षेत्रात अधिकार गाजवाल. मित्र-परिवाराकडून आलेले प्रस्ताव स्वीकारा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृती स्वस्थ्याची विशेष काळजी घ्या. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांच्या जोरावर तुम्हाला यश मिळेल. तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते.
आज सिंह राशीचे आरोग्य
जास्त काम आणि धावपळ यामुळे पाय दुखू शकतात आणि पायांना सूज येऊ शकते. सध्या जास्त काम करणे टाळा आणि विश्रांती घ्या.
सिंह राशीसाठी आजचे उपाय
पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ टाकून तिळाच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे तुमचे आरोग्य नीट राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :