लातूर : एकीकडे धरणांनी (Dam Storage) तळ गाठला आहे. तर दुसरीकडे पालेभाज्यांच्या भावात मोठी वाढ झालेली आहे. भाजीपाल्यांच्या दरामध्ये तुफान वाढ झाली आहे.  पंधरा दिवसात ठोक बाजारात भाजीपाल्याचे दर दुप्पट झाले आहेत.  किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत.  वाढत्या उष्णतेमुळे भाज्या  करपून गेल्या आहेत. 


वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाला करपून जात असल्याने एकीकडे शेतकरी हैराण आहे. मात्र उर्वरित भाजीपाला जगवावा कसा असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. अवकाळी पावसाने अनेक वेळेस जिल्ह्यात हजेरी लावली होती. आता पावसानं ओढ दिली आहे.  वाढलेल्या उन्हामुळे भाजीपाल शेतातच करपून जात आहे. पाणी दिल्यानंतरही उपयोग होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे.  आहे तसा माल काढून तो बाजारात आणला जात आहे. वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना फायदा होतोय. त्यापेक्षा जास्त उन्हामुळे करपून गेल्याने भाजीपाल्याचे नुकसान होते. 


मागील पंधरा दिवसात भाजीपाल्याच्या दरात प्रचंड वाढ


महात्मा फुले भाजी मार्केट लातूर येथे जिल्ह्याभरातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. त्यानंतर इथून भाजीपाला हा हैदराबाद, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या भागात पाठवला जातो. तसाच मोठा हिस्सा लातूरच्या बाजारपेठेचाही आहे.  मागील पंधरा दिवसात भाजीपाल्याचे दर दररोज वाढताना दिसत आहेत. या भाजीपालाच्या दरात 15 रुपये 20 रुपये वाढ करून किरकोळ बाजारात त्याची विक्री केली जात आहे.


ठोक बाजारात दरामध्ये प्रचंड वाढ


मागील पंधरा दिवसांमध्ये भाज्यांचे दर हे दुपटीने वाढले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी भाज्यांचे दर हे स्थिर होते. मात्र सतत वाढणारी उष्णता यामुळे पालेभाज्या पाणी असून सुद्धा करपून जात आहेत. यामुळे मालाची आवक वाढली होती. मात्र आता भाजीपाला उपलब्ध नसल्याकारणाने त्यात मागणी वाढल्याने भाव वाढत आहेत. ठोक बाजारात दरामध्ये झालेली ही प्रचंड वाढ किरकोळ बाजारात भाजीपाला दुप्पट दराने  विकला जातोय. 


मेथी आणि कांदापात 50 रुपये जुडी


शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असतो. तेथून विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करत किरकोळ बाजारात विक्री केली जाते.  नियमित आवकेच्या सुमारे 50 ते 60 टक्केच आवक सध्या होत आहे. त्यामुळे कोणत्याही भाजीचे दर 25 किंवा 30 रुपये पावशेरपासून सुरु होऊन 120 ते 150 रुपये किलोपर्यंत जात आहेत. कोथिंबीरसह सर्व पालेभाज्या महागल्या आहेत. मेथी आणि कांदापात 50 रुपये जुडी एवढा भाव मिळत आहे.       


हे ही वाचा :


धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती, नाशिकमधील भीषण वास्तव समोर