Dhiraj Deshmukh on Narendra Modi : लातूर येथे उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे कारखान्याचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार आहे. दरम्यान या कारखान्याच्या लोकार्पण सोहळ्यावरुन काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी पीएम मोदींवर टीका केली आहे. "या कारखान्याचे चौथ्यांदा उद्घाटन होत आहे. हा कारखाना रशियाला विकलेला आहे", असा आरोप देशमुख यांनी केलाय. तालुक्यातील खरोळा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 


धीरज देशमुख म्हणाले, गेल्या चार वर्षपासून रेल्वे फॅक्टरीच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल, असे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात कुणाच्याच हाताला काम मिळालेले नाही. फॅक्टरीसाठी विदेशातून पैसे आणणार म्हणले होते. पण येथे आपल्या कर्मचाऱ्यांना राबवून या महाशयांनी रशियाला पैसे दिले आहेत.त्यामुळे जनतेने जागृत होणे गरजेचे असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.


लातूर येथे उभा राहिलेला मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. येथील कोच फॅक्टरी बनवून तयार आहे. मात्र मागील दीड दोन वर्षापासून सुरू होणार सुरू होणार अशी चर्चा होती. उद्घाटनाअभावी काम थांबले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटी कोच फॅक्टरीचे उद्घाटन होणार आहे.


वंदे भारतच्या स्लीपर कोचची निर्मिती होणार


लातूर येथे सुरु होणार्‍या रेल्वे बोगी कारखान्यात जगात लोकप्रिय ठरलेल्या व सर्वाधिक मागणी असणार्‍या वंदे भारत कोचची तसेच वंदे भारतच्या स्लीपर कोचची निर्मिती होणार आहे. लातूर येथे तयार होणारे कोच देशात व जगात जाणार आहेत. त्यामुळे लातुरचे नाव जगभर होणार असल्याचे आ.निलंगेकर यांनी सांगितले. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याला सुरुवात करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन अनेक महिने झाले आहेत. मात्र अद्याप लोकार्पण सोहळा काही होत नाहीये. पहिल्या टप्प्यात या ठिकाणी १९२० रेल्वे बोगी तयार करण्याचे उद्दिष्ट असणार आहे. 


कारखान्याची स्थिती सध्या काय?


लातूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर लातूर कोच फॅक्टरी आहे. 350 एकरवरील क्षेत्र आहे . यापैकी 120 एकर वरील पहिल्यापेक्षा बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाला आहे.. पहिला फेजमध्ये एका महिन्यात 16 कोच निर्मिती शक्य आहे तर पहिल्या फेज मध्ये वर्षाला 250 कोच तयार होणार आहेत. दुसऱ्या फेजमध्ये वर्षाला 400 कोच आणि तिसऱ्या फेज म्हणजे वर्षाला 700 कोच निर्मिती करणारा अवाढव्य कारखान्याच्या पहिल्या फेज ची तयार १०० टक्के पूर्ण झाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची एन्ट्री लेट पण थेट! ठाकरेंचे विश्वासू वायकर शिंदे गटात का गेले? नेमकी कारणं काय?