Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विश्वासू आणि ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार रवींद्र वायकरांनी (Ravindra Waikar) एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आणि ठाकरेंना आणखी एक धक्का दिला. तसे रवींद्र वायकर हे ठाकरे कुटुंबियांच्या अतिशय जवळचे मानले जायचे पण वायकरांना ठाकरेंनी साथ सोडली आणि अखेर एकनाथ शिंदेसोबत का गेले यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट वाचा.
रवींद्र वायकरांची एन्ट्री लेट पण थेट!
रवींद्र वायकर, राजकारणातलं एक असं नाव जे थेट ठाकरेंच्या किचन कॅबिनेटच्या जवळचं मानलं जायचं. राजकारणात असे कमी लोक असतात की, जे पक्षाप्रमुखाच्या किचनपर्यंत पोहोचतात, त्यापैकीच एक म्हणजे रवींद्र वायकर. जोगेश्वर पूर्वचा ठाकरेंचा बुलंद आवाज, ठाकरेंचा मुंबई महानगरपालिकेपासून ते विधानभवनातला हुकमी एक्का. पण, आता हाच पत्ता एकनाथ शिंदेंच्या हाताला लागालाय.
ठाकरेंचे विश्वासू वायकर शिंदे गटात का गेले?
गेल्या काही दिवसांपासून रवींद्र वायकर यांच्यावर ईडीची चौकशी सुरु होती, एक ना अनेक आरोप वायकरांवर करण्यात आले होते. अशातच वायकरांची शिंदेकडे एन्ट्री ही चर्चेचा विषय बनली पण, वायकरांनी मात्र विकासांचं नाव पुढे करत सर्व चर्चांना पुर्णिविराम देण्याचा प्रयत्न केला.
नेमकी कारणं काय?
1. जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळ्याचा आरोप
शिवसेना गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच इडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. 9 जानेवारी 2023 रोजी ईडीच्या सुमारे 12 अधिका-यांनी त्यांची चौकशी केली होती. त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप वायकर यांच्यावर करण्यात आला होता. तसंच 'मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
2. पालिकेच्या जागेवर हॉटेलचं बांधल्याचा आरोप
जोगेश्वरी येथे मुंबई महानगरपालिकेचं मैदान आणि उद्यान आहे. मजासवाडी या परिसरात 13 हजार 674 चौरस फुटांची पालिकेची जागा आहे. या जागेवर पालिकेची परवानगी न घेता पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावरती करण्यात आला. यानंतर या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली. त्यांच्या घरावर छापा टाकला त्या दरम्यान कागदपत्रांची छाननीदेखील करण्यात आली. वायकर यांच्या घरासह इतर सात ठिकाणी ईडीने छापे टाकले होते.
3. वायकरांची ईडी चौकशी
29 जानेवारीलाही या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली. यासाठी त्यांनी ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. यापूर्वी दोन वेळा त्यांना चौकशीसाठी समन्स देण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टात माहिती देताना मात्र वायकर यांच्या प्रस्तावावर पुनर्विचार सुरू असल्याचे म्हटले आणि हे प्रकरण निकाली निघाले.
रवींद्र वायकर यांची आतापर्यंतची राजकीय कारकिर्द
मुंबई महानगरपालिकेत रवींद्र वायकर यांनी 20 वर्षं नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुंबईच्या जोगेश्वरी भागातून 1992मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेवर निवडून गेले. 2006-2010 याकाळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 2014 ला सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर 2019च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :